|

पुणे शहरातील लॉकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढविला, पोलिस आयुक्तांनी ट्विटव्दारे दिली माहिती

pune lockdown
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पुणे : शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहरातील लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढविला असल्याची माहिती ट्विटव्दारे दिली आहे. महाराष्ट्र शासनाने १ मे पर्यंत असलेला लॉकडाऊन वाढविल्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा लॉकडाऊन किती दिवसाचा असणार याविषयी निर्णय आज घेण्यात येणार होता. दरम्यान याबाबत पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी माहिती दिली आहे.

अमिताभ गुप्ता यांनी ट्विट द्वारे माहिती दिली की, पुणे शहरातील लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढविण्यात आला असून आंतरराज्यात व आंतर जिल्ह्यात ये जा करण्यासाठी त्यास ई पास अत्यावश्यक आहे. दरम्यान यावेळी ९ हजार नागरिकांना डिजिटल पासेस देण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरात सुरक्षित रहा असे आवाहन देखील पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे करांना केले आहे.

पुणे शहरात आतापर्यंत ३२ हजार नागरिकांनी ई पासेससाठी अर्ज दाखल केले असून त्यापैकी ९ हजार 363 जणांच्या पासेस मंजूर करण्यात आल्या आहेत तर, 16 हजार 375 नागरिकांच्या पासेस नाकारण्यात आल्या आहेत. आणखी 2 हजार 547 अर्ज प्रलंबित आहेत


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *