|

तुमच्यासारखे नेते राजकारणासाठी महाराष्ट्राचा अपमान व निंदा करीत आहेत, कॉंग्रेसचा भाजपवर निशाणा

Leaders like you are insulting and condemning Maharashtra for politics, Congress is targeting steam
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : देशात व राज्यात कोरोनाची परिस्थिती चिंता व्यक्त करणारी झाली आहे. कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. यामुळे मृत्येच्या प्रमाणात सुद्धा वाढ झालेली आहे. स्मशानभूमी आता अपूरी पडू लागली आहे. दरम्यान कोरोनावर आळा घ्यालण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे लस हा आहे मात्र यामध्ये राजकारण आडवे येताना दिसून येत आहे. केंद्र व राज्य यामध्ये लसीकरण असो वा बाकी सोयी सुविधा असो यामध्ये भेद करण्यात येत आहे. असे असताना राज्यातील भाजपच्या नेत्यांकडून सुद्धा राजकारण केले जात असून राज्य सरकारवर दोष देत आहेत. यावरून कॉंग्रेसने टीका केली आहे. तुमच्यासारखे नेते राजकारणासाठी महाराष्ट्राचा अपमान व निंदा करीत आहेत. अशी टीका आज महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

सचिन सांवत म्हणाले की, ”प्रकाश जावडेकरजी, महाराष्ट्रातील लशींचा अपव्यय ०.२२% आहे, तुमच्या खोटेपणानुसार ६% नाही. मोदी सरकारच्याच माहितीने तुमचा खोटारडेपणा उघड झाला. आम्हाला आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे ज्यांनी लसीकरणात महाराष्ट्राला १ल्या क्रमांकाचे राज्य बनवले व लशींचा कमीतकमी अपव्यय ठेवला. दु:ख याचे वाटते की, तुमच्यासारखे नेते राजकारणासाठी महाराष्ट्राचा अपमान व निंदा करीत आहात. गंभीर बाब – महाराष्ट्रात फक्त २३५४७ लशी शिल्लक आहेत. मोदीजी वेळेवर लशी देत नसतील तर आम्ही जनतेची सेवा कशी करावी? #महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा मोदींना लशी देण्यास सांगा” अशी टीका प्रकाश जावडेकर व मोदी सरकारवर केली आहे.

राज्यात कोरोनावर नियत्रंण आणायचे असल्याच लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. मात्र महाराष्ट्रात फक्त 23 हजार 547 लशी शिल्लक आहेत. मोदीजी वेळेवर लस देत नसतील तर आम्ही जनतेची सेवा कशी करावी? असा सवाल कॉंग्रेसकडून मोदी सरकारवर करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा मोदींना लसी देण्यास सांगा असा सल्ला कॉंग्रेसकडून राज्यातील भाजप नेत्यांना देण्यात आला आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *