…तरीही कुंभमेळा सुरू राहणारच

मृत्यू अटळ आहे; कुंभमेळा परंपरेचा त्याग करणार नाही
दिल्ली: देशभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरीही उत्तराखंड मध्ये कुंभमेळा सुरूच आहे. कुंभमेळ्यातील अनेक साधुंना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तर काही आखाड्यानी कोरोनामुळे समाप्तीची घोषणा केली आहे.
मात्र असे असताना जुना आखाड्याने मे पर्यंत हरिद्वार मध्ये राहणार असल्याची घोषणा केली आहे. २७ मे रोजी हनुमान जयंतीच्या स्नाना बरोबरच इतर तीन स्नान करणार असल्याचे जुना आखाडाचे प्रवक्ता श्रीमहंत नारायण गिरी यांनी सांगितले.
मृत्यू तर अटळ आहे. सगळ्यांना एक दिवस मरण येणारच आहे. मात्र आम्ही साधू कुंभमेळा परंपरेचा त्याग करणार नाही. आश्रमात आयासोलेशन वार्ड तयार करू मात्र आम्ही हरिद्वार सोडणार नसल्याची वल्गना त्यांनी यावेळी केली.
जुना आखाडाने सांगितले की २६मे पर्यंत आम्ही हरिद्वार मध्ये राहणार आहे. आणि कुंभमेळाच्या परंपरा पूर्ण करत २७ एप्रिल आणि इतर तीन स्नान पूर्ण करणार आहोत.
जुना आखाडाचे प्रवक्ता श्रीमहंत नारायण गिरी म्हणाले, अजूनही ४ स्नान बाकी आहेत. केंद्र, राज्य सरकार यांच्या गाईड लाईन या आपल्या हिशोबाने चालतात. आमच्या आखाडाची परंपरा आदी काळापासून चालत आहे. त्या परंपरे नुसार आमचा कुंभमेळा २६ मे पर्यंत सुरू राहील. आम्ही इथेच राहणार. काही साधू जात आहेत. ही कोरोना नैसर्गिक आपत्ती आहेत. दर १०० वर्षांनी येत असते. याला काही घाबरण्याची गरज नाही. सरकारचे गाईड लाईनचे पालन करणार कोरोनाची टेस्ट करणार. औषध घेणार. जर कोणाला कोरोना झाला तर त्याला आयसोलेशन वार्ड मध्ये शिफ्ट करणार. आम्ही २६ मे पर्यंत हरिद्वार मध्ये राहून कुंभमेळा करणारच असे जुना आखाडाचे प्रवक्ता श्रीमहंत नारायण गिरी यांनी सांगितले.