‘विमा कंपनीला झुकवून दाखवलं’

कैलास पाटील
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

उस्मानाबाद : खरीप 2020 हंगामातील नुकसान भरपाई नाकारणाऱ्या विमा कंपनीच्या विरोधात शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार कैलास पाटील यांनी ऐन दिवाळीत बेमुदत उपोषणाचं अस्त्र उचलून शेतकऱ्यांसाठी लढाई लढली होती.

दरम्यान, कैलास पाटील यांच्या लढाईला यश मिळालं असून विमा कंपनीला झुकावं लागलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.

या विम्यासाठी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही न्यायालयीन लढा दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही शेतकऱ्यांच्या बाजूनं निकाल देऊन आपल्या लढ्यास बळ दिलं.

तरीही मग्रूर कंपनी भरपाई देण्यास टाळाटाळ करत होती, यामुळे कैलास पाटील यांनी बेमुदत उपोषणाचं अस्त्र बाहेर काढलं होतं. सलग सात दिवस त्यांचं उपोषण सुरु होतं.

याबाबत कैलास पाटील म्हणाले, सलग सात दिवस संघर्ष केला. यामुळे 201 कोटी रुपये भरपाई वितरणास सुरुवात झाली. 1,69,086 शेतकऱ्यांना भरपाई देण्याची यादी कंपनीनं दिली होती. आंदोलनामुळे शेतकरी संख्या 1,84,413 ने वाढून 3,53,499 इतकी झाली.

आंदोलनामुळेच कंपनीचं बँक खाते गोठवणे, मालमत्ता जप्त करणे अशा कार्यवाही सुरू झाल्या. याचवेळी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिकाही दाखल झाली.

शेवटी कंपनीला झुकावंच लागले. 150 कोटी रुपये कंपनीने मान्य केले. केंद्र व राज्य सरकारनंही 220 कोटी रुपये जमा करण्यास संमती दर्शवली. यामुळे शेतकऱ्यांना 2020 च्या हंगामातील उर्वरित जवळपास 370 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग आपल्या सर्वांच्या संघर्षाने खुला झाला.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *