अंबानीच्या घरासमोरील स्फोटकाचा घटनाक्रम संशय निर्माण करणारा : देवेंद्र फडणवीस
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेले वाहन सापडल्यानंतर नंतर खळबळ उडाली होती. मात्र, घटनाक्रम पाहता संशय निर्माण करणारा आहे. याप्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून व्हावी अशी मागणी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच पोलीस अधिकारी सचिन वझे यांचा उल्लेख करून फडणवीस यांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत.
अंबानी यांच्या घरासमोर लावण्यात आलेल्या वाहनात जिलेटीनच्या कांड्या सापडल्या होत्या. या सर्व प्रकरणाबाबत फडणवीस यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याठिकाणी एक नव्हे तर दोन गाड्या होत्या. त्या दोन्ही गाड्या एकाच मार्गाने ठाण्यातून आल्या आहेत. गाडी ओळखल्याबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी सचिन वझे तिथे आले. स्थानिक पोलीस पोहोचण्या आधी ते तिथे आले होते. अगोदर त्यांना तपास अधिकारी म्हणून त्यांच्या नियुक्ती करण्यात आली होती. तीन दिवसांपूर्वी एसपी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. वझे यांना काढल? हे समजले नाही.
योगायोग म्हणजे ज्यांची गाडी चोरीला गेली. त्यांच्याशी एकाच क्रमांकावरून फोन गेल्याचे दिसते. हा क्रमांक सचिन वझे यांचा असल्याचे समजते. ज्या दिवशी गाडी ठाण्याला बंद पडली, त्यानंतर तो कॅब घेऊन कॉफड मार्केट ला गेला तिथे कोणाला भेटला हे काढल तरी अनेक गोष्टी कळेल असेही फडणवीस म्हणाले.
ज्या ओला कॅब मध्ये तो बसून गेला त्याचा रेकॉर्ड आहे. तो कोणाला भेटला हे त्या कॅब वाल्याने पाहिले आहे. अशा परिस्थिती सचिन वझे ठाण्यातील, वाहन ठाण्यातील आणि या दोघांचे आधीपासून संवाद हा योगायोग आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.