उच्च न्यायालय विचारतंय, “दाभोलकर प्रकरणाचा तपास आणखी किती दिवस?”

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

उच्च न्यायालयाची सीबीआयकडे विचारणा

मुंबई: अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपासावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. महाराष्ट्रानंतर कर्नाटकात घडलेल्या (कलबुर्गी हत्या प्रकरण) खटला सुरु झाला आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला ८ वर्ष तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला ६ वर्ष पूर्ण झाले. या प्रकरणाचा अद्याप तपास न झाल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.

न्यायालयाने संताप व्यक्त करत आणखी किती काळ तुमचा तपास सुरु राहणार आहे? असेच किती काळ सुरु राहणार? असा सवाल उपस्थित करत दोन आठवड्यात याला उत्तर देण्याचे आदेश सीबीआय आणि एसआयटीला दिले आहेत. तपासा बाबत ठोस उत्तर न दिल्यास जबाबदार अधिकाऱ्यांना सोडणार नाही अशी तंबी सुद्धा न्यायालयाने यावेळी दिली.

दाभोलकर, पानसरे यांच्या हत्या आधी होऊनही कलबुर्गी यांच्या हत्येचा खटला आदी कसा सुरु झाला? आम्ही सीबीआय आणि एसआयटीच्या कामावर शंका घेत नाही. पण, आणखी किती काळ हा तपास सुरु राहणार आहे. हे थांबवून खटला सुरु झाला पाहिजे. कर्नाटकात सुरु झाल्याचे ऐकून आम्ही अस्वस्थ झालो आहोत, कारण इथे अजून तपासच सुरु झाला नाही.

संवेदनशील प्रकरणाचा तपास कधी सुरु होणार आणि खटला कधी सुरु होणार जे जाणून घेण्याचा अधिकार देशातील नागरिकांचा आहे. दाभोलकर, पानसरे यांच्या खटल्यावर देखरेख ठेवावी अशी मागणी करणारी याचिका त्यांच्या कुटुंबीयांनी दाखल केली आहे. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआय करत आहे तर पानसरे यांच्या हत्येचा तपासा सीआयडीणे स्थापन केलेल्या एसआयटी मार्फत करण्यात येत आहे. पानसरे हत्या प्रकरणात तपास होत नसल्याची तक्रार त्यांच्या वकिलांनी केली आहे. दाभोलकर यांची हत्या २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात करण्यात आली. कॉ पानसरे यांच्यावर कोल्हापूर येथे १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळ्या झाडण्यात आल्या. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या या सर्व एकमेकाशी संबध आहे. आणि त्याच्या मागे सनातन संस्था आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *