Saturday, October 1, 2022
HomeZP ते मंत्रालयनायक-खलनायक-नायक असा होता संजय दत्तचा प्रवास!

नायक-खलनायक-नायक असा होता संजय दत्तचा प्रवास!

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तचा आज म्हणजेच 29 जुलै रोजी 62 वा वाढदिवस आहे. ‘संजू बाबा’, ‘मुन्ना भाई’ आणि ‘खलनायक’ या नावाने प्रसिद्ध असलेला बॉलीवूडचा सुपरस्टार “संजय दत्त” हिंदी सिनेसृष्टीत त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. संजयने प्रेमी, हास्य, गुन्हेगार आणि पोलीस अधिकारीयासह विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. आज संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्य जाणून घेऊया त्याच्या आयुष्याशी संबंधित खास गोष्टी…

‘रेशमा और शेरा’ या चित्रपटाद्वारे पदार्पण

संजय दत्तचा जन्म 29 जुलै 1959 रोजी मुंबईत झाला. प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस दत्त आणि सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्त आहे. संजय दत्तचे शिक्षण कसौली येथील लॉरेंस स्कुल मध्ये झाले. संजयने 1972 मध्ये बाल कलाकार म्हणून वडील सुनील दत्त निर्मित ‘रेशमा और शेरा’ या चित्रपटाद्वारे हिंदी सिनेमासृष्टीत पदार्पण केले.

‘रॉकी’ चित्रपटातून करिअरला सुरुवात

यानंतर संजय दत्तने अभिनेता म्हणून 1981 साली आलेल्या ‘रॉकी’ चित्रपटातून करिअरची सुरुवात केली आणि अनेक सुपरहिट चित्रपट हिंदी सिनेमासृष्टीला दिलेत. यात ‘सडक’, ‘खलनायक’, ‘नाम’, ‘साजन’, ‘वास्तव’, ‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘अग्निपथ’ या चित्रपटांचा समावेश आहे. ‘लगे रहो मुन्ना भाई’ या सिनेमासाठी संजयला मुन्नाभाई भूमेकेसाठी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येऊन तत्कालीन प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांच्याद्वारेही सन्मानित करण्यात आले.

संजय दत्तला तुरुंगवास

1993 मध्ये संजय दत्तला आतंकवाद्याल मदत करण्या संबंधी , अवैद्य रित्या घरात नौ मिमी पिस्टल आणि एके – छप्पन रायफल ठेवण्या प्रकरणी आतंकवादी विघटनकारी क्रियाकलाप कायदा अंतर्गत अटक करण्यात आली. याकरिता संजयला 18 महिने जेल मध्ये काढून 1195 मध्ये सुटका झाली. पण 2007 मध्ये त्याला सहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 21 मार्च 2013 रोजी दिलेल्या निकालात 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजयला पाच वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

2018 मध्ये संजय दत्तच्या जीवनावर आधारीत बनलेल्या ‘संजू’ या बायोपिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपटात संजूची प्रमुख भूमिका रणबीर कपूरने साकारली होती. हा चित्रपट 29 जून 2018 साली प्रदर्शित झाला.

संजय दत्तच्या वैयक्तिक आयुष्या विषयी बोलायचे झाले तर,

ऋचा शर्मा

1987 मध्ये संजय दत्त ऋचा शर्मासोबत विवाह बंधनात अडकले होते. ऋचा पासून त्यांना एक मुलगी देखील होती जीचे नाव त्रिशाला आहे. परंतु ऋचाला ब्रेन ट्युमर असल्यानं 1996 साली तिचा मृत्यू झाला. आई ऋचाचच्या मृत्यूनंतर आणि वडील संजय तुरुंगात गेल्यानं त्रिशाला आजी – आजोबांबरोबर संयुक्त राज्य अमेरिकेत रहायला गेली.

माधुरी दिक्षित

‘साजन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजय दत्त आणि माधुरी दिक्षित एकमेकांच्या जवळ आले. त्यांच्या अफेअरच्या बातम्या वर्तमानपत्र आणि वाहिन्यांवर येऊ लागल्या. मात्र, दोन्ही स्टार्सनी त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे काहीही सांगितले नाही.

संजय दत्त आधीच विवाहित होता आणि त्याला एक मुलगी देखील होती. हे सर्व माहीत असतानाही माधुरीचे संजय दत्तवर खूप प्रेम होते. जेव्हा माधुरीच्या घरच्यांना याची माहिती मिळाली तेव्हा ते यानात्याच्या खूप विरोधात होते. पण असे असतानाही माधुरीने कुटुंबाविरुद्ध जाण्याचे ठरवले.

परंतु, 1993 मध्ये झालेल्या मुंबईत बॉम्बस्फोट अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. या स्फोटात संजय दत्तचे नाव पुढे आले आणि त्याला तुरुंगात जावे लागले.
यादरम्यान, संजय दत्तने अनेकदा माधुरीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत, माधुरीने संजयसोबतचे सर्व संबंध कायमचे संपवले. आणि दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले.

माधुरी दीक्षितने संजय दत्तशी लग्न का केले नाही याचे कारण कोणालाच माहीत नाही. मात्र संजय दत्त तुरुंगात गेला नसता तर कदाचित आज त्यांचे नाते वेगळ्याच पातळीवर असते, हे निश्चित. यानंतर अनेक वर्षांनंतर माधुरी आणि संजय ‘कलंक’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर परतले.

रिया पल्लई

1998 मध्ये संजय दत्त मॉडेल रिया पल्लईसोबत विवाह बंधनात अडकला. मात्र, हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. परिणामी, 2005 साली त्या दोघांनी घटस्फोट घेतला.

मान्यता दत्त

यानंतर संजयला त्याच्या प्रत्येक कठीण प्रसंगी चढ-उतारात साथ देणारी मान्यता मिळाली. संजय दत्त आणि मान्यता यांची भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या भेटीनंतर दोघांची मैत्री झाली. त्यादरम्यान संजय दत्त नादिया दुर्राणीला डेट करत होता, मात्र, मान्यता आल्यानंतर संजयने मान्यताला डेट करायला सुरुवात केली. दोघांनी जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केले आणि 2008 मध्ये दोघांनी लग्न केले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मान्यता दत्त संजयची खूप काळजी घेत असे. मान्यता ज्या पद्धतीने संजय दत्तची काळजी घेत असे, बहुधा कोणीही काळजी घेतली नसेल. यामुळेच संजय दत्तने मान्यताला आपला साथीदार बनवले.

संजय दत्त आणि मान्यता यांच्या लग्नाला जवळपास 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघेही इकरा नावाच्या मुलीचे आणि शहरान नावाच्या मुलाचे पालक आहेत. संजय दत्तचा नुकताच ‘शमशेर’ चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

अधिक वाचा :

साउथच्या दिग्दर्शकांची सलमान खानसोबत काम करण्याची इतकी धडपड का?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments