पंढरपुरात प्रचाराच्या तोफा थंडावल्या; उद्या मतदान

पंढरपूर: पंढरपूर मंगळवेढा पोटनिडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत गुरुवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफाथंडावल्या. १७ तारखेला ही निवडणूक होत आहे.
भाजप आणि राष्ट्रवादीने पूर्ण जोर लावल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी भाजपने प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एकही प्रचारसभा घेतली नाही. दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने बरेच आरोप एकमेकांवर करण्यात आले. यात उपमुख्यमंत्री अजीत पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राम कदम हे नेते आघाडीवर होते.
तरीही ही निवडणूक दोन्ही पक्षांना सोपी नसून अटीतटीची होईल याबाबत नागरिक बोलून दाखवत आहेत. अजित पवार गेले चार दिवस पंढरपूर मध्ये ठान मांडून होते. तसेच त्यांनी काही सभा चांगल्याच गाजवल्या. त्यांनी भाजपच्या नेत्यांवर चांगलीच टीका केली. त्यावर चांगलेच पलटवार झाले. चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँक आदींची आठवण करून दिली. त्यावर अजित पवार यांनी आपल्या शैलीत उत्तर देत चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस हे शेतकरी वाटत का असा सवाल उपस्थित केला.
राष्ट्रवादी प्रदेश्याध्यक्ष जयंत पाटील यांनी पाणी प्रश्नावरून पुन्हा एकदा वाद छेडला. यावेळी त्यांनी जत पर्यंत जावून पाणी प्रश्न कसा सोडवता येईल याची चाचपणी केली.
यावेळी स्वभामनी आणि शिवसेनेतील बंडखोरी ने राष्ट्रवादी समोर आव्हान उभे केले आहे. याच बरोबर वंचित आणि इतर लहान आघड्यांचा सुद्धा फटका बसले असे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे समाधान आवतडे यांना त्यांचे चुलत बंधू सिध्देश्वर आवतडे हे त्यांना अडचणीचे ठरणार आहे. भगीरथ भालके यांना वडिलांची सहानुभूती मिळणार असल्याचे चित्र आहे. संपूर्ण प्रचाराचा धुरा अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे होता.कल्याणराव काळे यांना पक्षात आणून पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला गेला. २ मे रोजी निकाल लागणार आहे.