|

कोरोना लढ्यात पांड्या ब्रदर्सची मोठी मदत!

Great help to Pandya Brothers in Corona fight!
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या काळात देशभरात अनेक ठिकाणी अपुऱ्या औषधामुळे आणि अपुऱ्या ऑक्सिजनमुळे रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली.
आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर अनेक खेळाडू पुढे येत कोरोनाच्या या लढ्यात वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहे. यात आता आणखी एक नाव जोडले गेले आहे. ते म्हणजे कृणाल आणि हार्दिक या पांड्या बंधूचे. मे महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही पांड्या बंधूंनी २०० ऑक्सिजन संच कोविड सेंटरला देण्याचे आश्वासन दिले होते. दिलेले वचन पूर्ण करत दोन्ही पांड्या बंधूंनी कोरोना पीडितांसाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन संच उपलब्ध करू दिले आहेत.
कृणाल पांड्याने एक ट्विट करून याबद्दल माहिती दिली. या ट्विटमध्ये कृणाल म्हणतो की,’सर्वजन कोरोनावर मात करत लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करत ऑक्सिजन संच कोवीड सेंटरला पाठवत आहोत.’ असे लिहीत त्याने ऑक्सिजन संचाचा एक फोटो ट्विट केला आहे. या ट्विटला कृणालचा भाऊ हार्दिकने रिट्विट करत ‘कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात आपण एकत्रपणे लढू आणि विजय मिळवू’ असे लिहीले आहे.
याआधीही क्रिडा क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी कोरोनापीडितासाठी मदत केली आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *