वाझेंमुळे सरकार पडणार नाही
दिल्ली: शिवसेनेत सामील होणे हा काही गुन्हा आहे का. शिवसेना ही काय बंदी घातलेली संघटना आहे का. प्रत्येक मराठी माणसाचा शिवसेने सोबत कधीना कधी संबंध येतो. एखादा व्यक्ती पूर्वाश्रमीचा शिवसैनिक असणे हा काही गुन्हा आहे का. एका सहाय्यक पोलीस अधिकाऱ्यावरून काय घडामोडी घडणार आहेत. वाझेंमुळे सरकार पडणार या भ्रमात विरोधकांनी राहू नये असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.
पुढे राऊत म्हणाले, सचिन वाझे प्रकारामुळे काहीही घडामोडी घडत नाही. एका सहाय्यक पोलीस अधिकाऱ्यावरून सरकार अस्थिर होईल या भ्रमातून सगळ्यांनी बाहेर पडावे. महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे. सचिन वाझेंमुळे हे सरकार पडणार नाही. कालच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे हे सरकार तीन वर्ष पडणार नाही. राष्ट्रीय तपास यंत्रांना बिगर भाजप राज्यात जाऊन कारवाई करण्याचा छंद जडला असल्याची टिका सुद्धा त्यांनी यावेळी केली. सुशांत सिंह प्रकरणात, इडीच्या अनेक प्रकरणात काय झाले हे आपण पहिलेच आहे. यामुळे यांच्या कारवाईकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात एल्गार परिषदेत हिंदू धर्माविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप असणाऱ्या अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शर्जील उस्मानी याबाबत विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली होती. त्याला उत्त्तर देतांना राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे चांगले वकील आहे. त्यानी उस्मानी विरोधात कुठले कलम लावावे या संदर्भात मदत करायला हवी. शर्जील हा भाजपच सरकार असणाऱ्या उत्तरप्रदेश मध्ये लपून बसला आहे हे पण लक्षात घ्यावे. अशी टिका संजय राऊत यांनी केली.