देवेंद्र फडणवीस सरकार चालू देतील तो पर्यंत सरकार चालेल

इंदापूर: जो पर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकार चालू देतील तो पर्यंत हे सरकार चालणार, अस मत केंद्रिय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. ते इंदापूर येथे माध्यमांशी बोलत होते.
पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले प्रचारासाठी आले होते. ते काही वेळ इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार किती दिवस टिकेल असा प्रश्न उपस्थित केल्यावर रामदास आठवले म्हणाले, हे राज्य सरकार जो पर्यंत देवेंद्र फडणवीस चालू देतील तो पर्यंत चालेल. तसेच सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली आहे. यामुळे महाराष्ट्राची देशभर बदनामी झाली आहे अस सुद्धा रामदास आठवले म्हणाले.
पंढरपूर पोटनिवडणुक
पंढरपूर पोटनिवणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. राष्ट्रवादीतर्फे भगीरथ भालके तर भाजपा कडून समाधान आवतडे यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवार तगडे असल्याने ही पोटनिवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे.