Tuesday, October 4, 2022
Homeब-बातम्यांचाएसटी संदर्भात सरकारचा लवकरच मोठा निर्णय

एसटी संदर्भात सरकारचा लवकरच मोठा निर्णय

मुंबई: राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार पासून राज्यभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. असे असतांना राज्यात सर्व प्रकारची खासगी, सार्वजनिक वाहतूक नियमितपणे सुरूच राहील, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

मात्र आता कोरोना संसर्ग पसरण्याचा वेग वाढल्याने सरकार आणखी कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारकडून एसटी बस सेवेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो. आंतरराज्यीय एसटी वाहतूक बंद करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. यापूर्वीच मध्यप्रदेशात जाणाऱ्या आणि येणाऱ्या बस वर प्रतिबंध आणले आहे.

सध्या महाराष्ट्रातून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा या राज्यांत आंतरराज्य एसटीची प्रवास वाहतूक सुरू आहे. त्यापैकी मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातील एसटी वाहतूक आधीच बंद केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारही इतर राज्यातील एसटी प्रवास वाहतूक बंद करून कोविड १९ संसर्ग रोखण्यासाठीचा निर्णय लवकरच जाहीर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, याबाबतच्या कोणत्याही निर्णयाची राज्य सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र लवकरच अशी घोषणा होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments