माजी मंत्र्याची पोलिसांसोबत बाचाबाची, पोलिसांना म्हणाले तुम्ही सरकारचे कुत्रे
अमरावती: राज्यसेवेची पूर्व परीक्षा रद्दच्या निर्णयानंतर राज्यभर विध्यार्थ्यानी आंदोलन केले होते. अमरावती येथे सुद्धा आंदोलन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी ठरलेल्या तारखेत १४ मार्च रोजी राज्यसेवाची पूर्व परीक्षा घ्यावी अशी मागणी केली होती. यावेळी बोंडे यांनी पोलिसांना उद्देशून “तुम्ही सरकारचे कुत्रे आहात असा उल्लेख केला.”
परीक्षा पाचव्यांदा रद्द केल्याने राज्यभरातील विध्यार्थी आंदोलन करत होते. अमरावती येथे सुद्धा विद्यार्थी आंदोलन करत होते. यांना पाठींबा देण्यासाठी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे आले होते. यावेळी त्यांची आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. बोंडे यांनी पोलिसांना उद्देशून तुम्ही सरकारचे कुत्रे आहात असे हिणवले. यावेळी पोलिसांनी त्यांना तुम्हीच कुत्रे आहात असे प्रती उत्तर दिले.
चोराप्रमाणे MPSC च्या विद्यार्थ्यांना आत मध्ये टाकलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पो. नि. चोरमाले यांना तात्काळ निलंबित करा व 14 तारखेलाच विद्यार्थ्यांची परीक्षा घ्या. अन्यथा राज्यसरकारने परिणामाला सामोरे जाण्यास तयार राहावे. भाजपा विद्यार्थ्यांसोबत आहे. @BJP4Maharashtra pic.twitter.com/A6QdFrpC7A
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) March 11, 2021
याचा व्हिडिओ बोंडे यांनी ट्वीट केला आहे. त्यात त्यांनी आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत, तुमच्याकडे नाही असे सांगितल्यावर पोलीस अधिकारी भडकले. तुम्ही आंदोलन करता आम्हाला नियंत्रण मिळवावे लागते. तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका, असे पोलिसांनी बोंडे यांना सुनावले. त्यावेळी पोलीस आणि बोंडे यांची बाचाबाची झाली. रागवलेल्या बोंडे यांनी पोलिसांना तुम्ही सरकारचे कुत्रे आहात असा उल्लेख केला. यानंतर संतापलेल्या पोलिसांनी बोंडे यांना ताब्यात घेतले बोंडे यांनी पोलिसांना अर्वाच्य भाषा वापरल्या बद्दल त्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या करण्यात येत आहे.