वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी श्रीनिवास रेड्डींना अटक

अमरावती : वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी आज मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबीत क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अमरावती ग्रामीण व नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी मिळून अटक केली आहे. दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली या घटनेमुळे वन विभागासह राज्य हादरुन गेले होते. दरम्यान दिपाली चव्हाण यांनी चार पानी सुसाईड नोट लिहली होती. त्यानंतर उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान श्रीनिवास रेड्डी मेळघाट प्रकल्पाचे माजी संचालक यांना सुद्धा निलंबीत करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलिसांकडून रेड्डी यांना नागपूर येथून अटक करण्यात आली आहे.
श्रीनिवास रेड्डी पसार झाले होते. त्यांनी अचलपूर न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता तेव्हा पासून ते पसार होते. यावेळी पोलिस त्यांच्या शोधात होते दरम्यान बुधवारी ते नागपूरात असल्याचे पोलिसांना त्यांच्या लोकेशनवरुन लक्षात आले तेव्हा अमरावती ग्रामिण पोलिसांनी आपले एक पथक नागपुरात रवाना केले व नागपूर गुन्हे शाखे व स्थानिक सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी रेड्डी यांचा शोध घेतला व त्यांना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी पुनम पाटील यांनी श्रीनिवास रेड्डी यांच्या अटकेला पुष्ठी दिली.