Wednesday, September 28, 2022
Homeथेटर ते स्टेडीयमIPL ची पहिली मॅच काही तासांवर! RCB च्या कँपमध्ये काळजीचं वातावरण.

IPL ची पहिली मॅच काही तासांवर! RCB च्या कँपमध्ये काळजीचं वातावरण.

चेन्नई: आयपीएलमधील पहिली मॅच सुरु होण्यासाठी ४८ तासांपेक्षाही कमी कालावधी उरला आहे. त्यापूर्वी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमला आणखी एक धक्का बसला आहे. आरसीबीचा ऑल राऊंडर डॅनियल सॅम्स याची कोरना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आरसीबीनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनच ही माहिती दिली आहे.
‘डॅनियल सॅम्स ३ एप्रिल रोजी चेन्नईतील टीमच्या हॉटेलमध्ये दाखल झाला. त्यावेळी त्याचा कोरोना रिपोर्ट हा निगेटीव्ह होता. त्याच्या दुसऱ्या चाचणीचा रिपोर्ट ७ एप्रिल रोजी मिळाला आहे. त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला आहे. सध्या तो आयसोलेशनमध्ये असून मेडिकल टीम त्याच्यावर उपचार करत आहे.’ असं ट्विट आरसीबीनं केलं आहे.
यापूर्वी चॅलेंजर्स बंगळुरु टीमचा ओपनर देवदत्त पडिक्कल याला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं होतं. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर देवदत्तवर बंगळुरमध्येच घरीच उपचार करण्यात येत आहेत. देवदत्त पहिल्या दोन मॅच खेळण्याची शक्यता कमी आहे.
देवदत्त हा आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मागच्या वर्षी युएईमध्ये त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच सिझनमध्ये त्यानं सर्वांना प्रभावित केलं.
देवदत्त पाठोपाठ डॅनियल सॅम्सला देखील कोरोनाची लागण झाल्यानं आरसीबीच्या कँपमध्ये काळजीचं वातावरण आहे. आरसीबीची पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध ९ एप्रिल रोजी चेन्नईत होणार आहे.
डॅनियल सॅम्स हा कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला आयपीएलमधील चौथा खेळाडू आहे. यापूर्वी टीम इंडियाचा ऑल राऊंडर आणि दिल्ली कॅपिटल्स टीमचा प्रमुख खेळाडू असलेला अक्षर पटेल देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. कोलकाता नाईट रायडर्स टीमचा बॅट्समन नितीश राणा याला कोरोनाची लागण झाली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments