फडणवीस–पवार यांनी गाजवला अधिवेशनाचा पहिला दिवस

मुंबई: अधिवेशनाचा पहिला दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गाजवला. वैधानिक विकास महामंडळाच्या नियुक्त्यांवरून सभागृहात मोठी खडाजंगी झाली. फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास महामंडळावर नियुक्त्या करण्यात याव्यात अशी मागणी केली.
यावर अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे विधान परिषदेच्या १२ जागांसाठी नावे दिली आहेत. ज्या दिवशी राज्यपाल या नावांना मंजुरी देतील त्याच्या दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास महामंडळ सदस्याची नावे जाहीर होतील असे विधान केले. यानंतर सभागृहात मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.
यानंतर फडणवीस हे आक्रमक होत म्हणाले, अजित दादा यांच्या पोटातील ओठांवर आले आहे. १२ आमदारांसाठी वैधानिक महामंडळ ओलीस ठेवली आहेत. वैधानिक महामंडळ हे मराठवाडा, विदर्भाची कवच आहेत. ही जर नसती तर कस लुटून नेल असत हे सभागृहात नेहमी मांडला आहे. तो विषय राज्यपाल आणि तुमचा आहे. या बाबत सभागृह आणि राज्याला काही देण घेण नाही. राज्यपाल हे कुठल्या पक्षाचे आहेत. जर १२ आमदारांसाठी विदर्भ, मराठवाड्याला ओलीस ठेवले तर तेथील जनता माफ करणार नसल्याचे सांगितले.
जर तुम्ही आमच्या हक्काच दिल नाही तर आम्ही ते संघर्ष करून मिळवू हे भिक नाही आहे. आम्ही भिकारी नाही. हक्काचे आहे ते आम्ही मिळवणार, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. अजित पवार जे म्हणाले त्याचा मी निषेध करतो असेही ते म्हणाले.
नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले,”वैधानिक विकास महामंडळाच्या नियुक्त्या करावा अशी मागणी हात जोडून करत आहे. विदर्भाच्या जनतेचा अपमान करून नका.” सरकारचा निषेध करत विरोधी पक्षाने सभात्याग केला.