|

फडणवीसांनी नाशिक जिल्हा दत्तक घेतलाय, उशिरा का होईना मदतीला आले – छगन भुजबळ

Fadnavis have adopted Nashik district, why they came to help late - Chhagan Bhujbal
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

नाशिक : नाशिकमधील कोरोनाच्या स्थितीवर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. लॉकडाऊनमुळे नाशिकमध्ये आठवड्याला २ हजाराने नाशिक जिल्ह्यांची रुग्णसंख्या कमी झाली आहे असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे. यावेळी छनग भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच टोलाही लगावला आहे.
छगन भुजबळ म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून अजून २ टँकर्स ऑक्सिजनचे मिळतील तर आनंद आहे. सर्वांचं सहकार्य हवं आहे. ऑक्सिजन मिळत नाहीये. फडणवीसांनी नाशिक जिल्हा दत्तक घेतलाय, उशिरा का होईना मदतीला आले त्यांचं स्वागत आहे. देवेंद्र फडणवीसांचे दिल्लीत वजन आहे त्यांनी जीएसटीचे पैसे आणावेत असंही भुजबळ यावेळी म्हणालेत.
सिन्नर ऑक्सिजन प्लॅन्टमधून ६०० सिलेंडर उत्पादन निर्मिती होत आहे. आम्ही प्रयत्न केले म्हणून ऑक्सिजन ट्रेन आली. हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारी यंत्रणा जिल्ह्यात १० ठिकाणी आहे आणि त्यासाठी १० कोटी मंजूर झाले असून १५ दिवसांत हे काम पूर्ण होईल.
छगन भुजबळ पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत याबद्दल मी काय बोलणार. कोरोना प्रतिबंधक लस ही भारत सरकार ठरवते तशा प्रकारे मिळते. केंद्र सरकारने दिल्यानुसार राज्य सरकार वाटप करतं. महाराष्ट्रात लस उपलब्ध झाल्यावर १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होईल. लसीकरणात महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दौरा
पंतप्रधान काळजी निधीतून नाशिक मध्ये प्राणवायू निर्मितीचे चार प्रकल्प उभारले जाणार असून उद्योगांकडून अतिरिक्त दोन टँकर प्राणवायू दर आठवडय़ाला उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितले. कोरोनाच्या संकटात राज्य सरकारमधील बलशाली नेते आपल्या भागात अधिकाधिक रेमडेसिविर आणि प्राणवायू खेचून नेत आहेत. नाशिक शहर आणि ग्रामीण भागात सकारात्मकतेचा दर ३० टक्क्यांहून अधिक असताना पुरवठा अतिशय कमी आहे. राज्य सरकारने प्राणवायू, रेमडेसिविरचे तर्कशुध्द वाटप आणि पुरवठा करण्याची गरज असल्याचेही फडणवीस म्हणाले. सध्या द्रवरूप प्राणवायूची कमतरता असल्याचे समजल्यानंतर रिलायन्स आणि जिंदाल कंपनीकडून प्रत्येकी एक म्हणजे दोन अतिरिक्त टँकरची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *