महिला आमदाराने विधानसभेत घेतली घोड्यावर एंट्री, सगळीकडे चर्चेला उधाण
झारखंड: राजकारण हे महिलांचं क्षेत्र नाही असं एकेकाळी म्हटलं जायचं पण आता मात्र हेच म्हणणं महिला खोटं ठरवत आहेत. झारखंडच्या बरकागाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अंबा प्रसाद यांनी ही गोष्ट वारंवार चुकीची ठरवली आहे. महिला आज कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा मागे नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदे लाऊन त्या सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. अंबा या झारखंडच्या सर्वात तरुण आमदार आहेत. आपल्या उत्कृष्ट आणि चोख कामासाठी त्यांची राज्यात ओळख आहे. या कामांमुळेच त्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक अनोखी भेट मिळाली आहे. अर्जुन पुरस्काराने सन्मानित झालेल्या सेवानिवृत्त कर्नल रवी राठोड यांनी आमदार अंबा प्रसाद यांना एक सुंदर घोडा भेट म्हणून दिला आणि आमदार अंबा प्रसाद महिला दिनाचं औचित्य साधून घोड्यावर विधानसभेत आल्या. जरी या घोड्याला आत जाऊ दिले नसले तरी अंबाच्या या शैलीने सर्वांचे मन जिंकले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय महिला दिनी अंबा प्रसाद रोदे यांचं हे अनपेक्षित आणि लक्षवेधी कृत्य चांगलंच चर्चेत आहे.
अंबा प्रसाद रोदे या अवघ्या २७ वर्षांच्या आहेत. या तरुण वयातच, दृढ हेतू असतील तर माणसासाठी वयाची मर्यादा नाही हे सिद्ध करून त्यांनी २०१९ च्या निवडणुकीत आपला विजय प्राप्त केला. अंबाने आपला प्रतिस्पर्धी आजसू पक्षाचे उमेदवार रोशनलाल चौधरी यांना ३० हजार १४० मतांनी पराभूत करून विजय मिळविला. अंबा प्रसाद यांना ९३ हजार २९५ मते मिळाली होती.
अंबा प्रसाद या बरकागाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्यांचे वडील योगेंद्र साहू २००९ मधे तर त्यांच्या आई निर्मला देवी २०१४ याच मतदारसंघात आमदार होते. त्यानंतर अंबा प्रसाद यांनीही २०१९ मध्ये हा विजय कायम ठेवला