भाजप नेत्यांचा अहंपणा नडला

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

जळगाव : स्पष्ट बहुमत असतांना सुद्धा जळगाव महापालिकेची सत्ता महाविकास आघाडीने खेचून आणली आहे.  शिवसेनेचा महापौर विराजमान झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी याबाबत भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर तोफ डागली आहे.

महापलिकेत भाजपची एकहाती सत्ता होती. मात्र नागरिकांचे काम होत नव्हते. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पाण्याची समस्या आहे. नागरिकांबरोबर नगरसेवकही नाराज होते. त्या नाराजीतून ते नगरसेवक आमच्याकडे आले आणि सत्ता परिवर्तन सोप झाल्याचे खडसे म्हणाले.

दहा दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बोलताना जळगावचा विषय निघाला. जळगाव मध्ये तुम्ही लक्ष घालावे अशी विनंती मी त्यांना केली. त्या चर्चेवेळी निवडणुकीचा विषय निघाला. शिवसेनेन महापौर पदासाठी उमेदवार दिला तर मी त्यात लक्ष घालेन, असा शब्द मी त्यावेळी दिला होता. भाजप बद्दल त्याच्या नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. त्यांना आवाहन केले तर हे जमू शकते. आमच्याबरोबर आजच २२ नगरसेवक आहेत, अस मी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यानंतर मी, एकनाथ शिंदे, विनायक राऊत मध्ये चर्चा झाली. त्यातूनच शिवसेनेचा महापौर करायचे ठरले. यासाठी नाराज भाजपच्या नगरसेवकांसाठी काही जास्त कराव लागल नाही. यातील अनेक नगरसेवक माझ्याकडे दीड महिन्यापासून फेऱ्या मारत होते. सगळ्यांच्या भेटीतून हा प्लान ठरला. ठरल्यानुसार सगळा प्लान ठरला. गुलाबराव पाटील यांना केवळ ५ दिवसापूर्वी याची माहिती देण्यात आली. त्यांनीच नाराज नगरसेवकाची व्यवस्था केली. अशी माहिती खडसे यांनी दिली.

भाजप नेत्यामध्ये अहंपणा आहे

भाजपच्या स्थानिक नेत्यामध्ये एक अहंपणा, गर्विष्ट्पणा आहे, गिरीश महाजन यांच्या वागणुकीबद्दल नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. दिलेली आश्वासन न पूर्ण केल्याने हे सर्व सुरु आहे. त्याचा परिमाण असा झाला की हे सर्व नगसेवक आमच्याकडे आले असल्याचे खडसे यांनी सांगितले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *