|

खाकी वर्दीचा मान व शान अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. हेमंत नगराळे यांची मुंबईचे पोलीस आयुक्त बदली झाली आहे. यानंतर पहिल्यांदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एखाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा. अस ट्वीट त्यांनी केल आहे.

हेमंत नगराळे मुंबईचे पोलीस आयुक्त असणार आहे. परमबीर सिंह यांच्याकडे गृह दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेले वाहन सापडले होते. त्यानंतर काही दिवसात या वाहनचा मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाला होता. या सर्व प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव घेण्यात आले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर आरोप केले होते. तसेच अनेक महत्वाचे खुलासे सभागृहात केले होते.

            फडणवीस यांच्याकडे महत्वाचे कागदपत्रे गेली कसे आदी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तसेच परमबीर सिंह यांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले होते.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *