Monday, September 26, 2022
Homeब-बातम्यांचालसीकरणातील दिरंगाई ही तरुणाईच्या जीवावर उठणारी आहे – कॉंग्रेसची गंभीर टीका

लसीकरणातील दिरंगाई ही तरुणाईच्या जीवावर उठणारी आहे – कॉंग्रेसची गंभीर टीका

मुंबई : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात लसीकरण वेगात होणे गरजेचे आहे. केंद्र सरकराने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, पुरेसी लस उपलब्ध नसल्याने लसीकरण करायचे कसे असा प्रश्न राज्य सरकारने उपस्थित केला आहे. यावरून कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर गंभीर टीका केली आहे.
काय म्हणाले सचिन सावंत
१ मे पासून १८ ते ४४ या वयोगटातील देशाच्या तरुण कार्यशक्तीचे लसीकरण केंद्र सरकारने जाहीर केले परंतु अत्यंत ढिसाळ आणि नियोजन शून्य मोदी सरकारने लशींचा पुरवठा न केल्याने हा कार्यक्रम देशपातळीवर सुरू होऊ शकणार नाही हे दुर्दैव आहे. जगात लसीकरण युध्दपातळीवर सुरू असताना व भारतात कोरोनामुळे मृत्यूचा तांडव चालला असताना ही मोदी सरकारची बेफिकिरी अपराधी प्रवृत्तीची आहे.
शिवराज सिंह चौव्हाण यांनीही मध्यप्रदेशात लशींअभावी १ मेला लसीकरण सुरू होणार नाही असे स्पष्ट केले. लशींचा साठा उपलब्ध नसल्याने देशस्तरावर एवढा मोठा कार्यक्रम ढेपाळण्यासाठी मोदी सरकार जबाबदार असतांना भाजपचे राज्यातील प्रवीण दरेकर सारखे नेते व भाजपा आयटी सेल मात्र राज्य सरकारला दोष देत आहे व अपप्रचार करत आहे. याला चोराच्या उलट्या बोबा म्हणतात. देशातील युवावर्गाची जबाबदारी मोदी सरकारने राज्यांवर ढकलली पण आता लसीकरणातील दिरंगाई ही तरुणाईच्या जीवावर उठणारी आहे.
ही दिरंगाई केवळ १८-४४ वयोगटात नाही. ४५ वर्षांवरील वयोगटातील लसीकरणही केंद्राने लशींचा पुरवठा नीट न केल्याने सातत्याने अडचणीत येत आहे. महाराष्ट्राला जाहीर केलेल्या ४३५००० रेमडेसीवीरपैकी केवळ २,३०,००० इंजेक्शन पाठवले. मोदी सरकार दिलेले शब्द पाळत नसेल तर राज्यांनी नियोजन कसे करावे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments