मोक्क्यातील आरोपी दीप्ती काळेची पुण्यात आत्महत्या

Deepti Kale died after falling from the eighth floor
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पुणे : ससून रुग्णालयाच्या 8व्या मजल्यावरुन एका महिलेने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव समोर येताच शहरात व पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. कारण आत्महत्या केलेल्या महिलेवर मोक्काची कारवाई करण्यात आली होती. दीप्ती काळे असे या महिला आरोपीचे नाव असून तीने ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. तसेच ही महिला पळून जाण्याचा प्रर्यंत्न करत असताना पडली असावी असाही अंदाज वर्तविला जात आहे. या आत्महत्ये प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

दीप्ती काळे आणि निलेश शेलार यांच्यावर शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक बळवंत मराठे यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान दीप्ती यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती त्यामध्ये ती पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे तीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांच्या कडून 46 गुंठे जागा नावावर करुन घेत आणखी 56 गुंठे जागेची मागणी करत धमकावल्याच्या तक्रारीवरून कालच तीच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आजच या टोळीवर मोक्का अतंर्गत कारवाई केली असून या टोळीची प्रमुख दीप्ती काळे ही होती. दरम्यान दीप्तीने आज ससून रुग्णालयाच्या बाथरुमधून खाली उडी मारली असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *