Wednesday, September 28, 2022
Homeब-बातम्यांचाव्याज दरावरील कपातीचा निर्णय मागे

व्याज दरावरील कपातीचा निर्णय मागे

सकाळी पेपर वाचल्यावर कळाल असेल; विरोधकांकडून टिका

दिल्ली: केंद्र सरकारने लहान बचत योजनावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. आर्थिक वर्ष २०२०-२२ च्या पहिल्या तिमाहीत लहान बचत योजना वरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय रात्री उशिरा घेण्यात आला होता. त्यावर मोठ्या प्रमाणात टिका होत असल्याने व्याज दर कपातीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

बचत खात्यातील व्याजदरात ०.५ टक्के कपात करण्यात आली होती. त्यामुळे व्याज दर ४ टक्क्यावरून ३.५ टक्क्यावर आला होता. मात्र आता तो पूर्वीसारखा ४ टक्केच राहणार आहे. सुकन्या समृद्धी खाते योजनेंतर्गत उपलब्ध व्याजदर ७.६ टक्केच राहणार आहे. याचबरोबर राष्ट्रीय बचतप्रमाणपत्रावरील व्याज दर ६.८ टक्केच राहणार आहे.

पीपीएफ व्याजदर ७.१ टक्केच राहणार आहे. व्याजात सर्वाधिक १.१ टक्के कपात एक वर्षाच्या मुदतठेवीवर करण्यात आली होती.

आज सकाळी निर्मला सीतारमण यांनी व्याजकपातीचा निर्णय नजरचुकीने घेण्यात आल्याचे ट्वीट करण्यात आल्याचे सांगितले.  

निर्णय मागे घेतल्यानंतर कॉंग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी आणि शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या स्पष्टीकरनावरून सीतारमण यांच्यावर टिका केली आहे.

प्रियंका गांधी यांनी ट्वीट करून खरोखरच तुमच्याकडून चूक झाली की काय असा टोला लगावला आहे. “खरच निर्मला सीतारमण तुमच्याकडून सरकारी योजनावरील व्याज कपात करण्यासंदर्भात निर्णय चुकून प्रसिद्ध झाला की निवडणुका लक्षात घेऊन तुम्ही हा निर्णय घेतला हा सवाल त्यांनी विचारला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments