ईडीची तारीख आली की यांना कोरोना होतो
जळगाव: ईडीची तारीख आली की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोना होता असा टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी लगावला. महाजन यांना कोरोना झाल्यावर खडसे यांनी इतक्या तरुण आणि व्यायाम नेत्याला कोरोना कसा होतो असा प्रश्न उपस्थित केला होता. कोरोनामुक्त झाल्यानंतर महाजन यांनी खडसे यांच्यावर पलटवार केला.
मला ‘जो’ कोरोना होतो तो ईडीच्या तारखा पाहून होत नाही. खडसे यांना ईडीच्या तारखा पाहूनच कोरोना होतो. माझे असे नाही मला एकदाच कोरोना झाला असे प्रतिउत्तर महाजन यांनी खडसे यांना दिले.
कोरोना झाल्याने गेल्या १० दिवसापासून गिरीश महाजन उपचार घेत होते. त्यांची नुकतीच कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्या नंतर जळगाव येथे येऊन आरोग्य विभागाची पाहणी करून उपाययोजनेचा आढावा घेतला.
पहिले महाजन यांनी खडसे यांना तीन-तीन वेळा कसा कोरोना होतो? याचे संशोधन केले पहिले पाहिजे असे डिवचले होते. त्यानंतर महाजन यांना कोरोना झाल्यानंतर ‘गिरीश महाजन हे नियमित व्यायाम करून फीट राहतात. यंग नेते म्हणून परिचित आहेत. त्यांना खरच कोरोना झाला का? की जळगाव महापालिकेतील भाजपची सत्ता गेल्याने कोरोना झाला’ असा टोला लगावला होता. खडसेंच्या या वक्तव्याचा आज महाजन यांनी समाचार घेतला.
महाजन म्हणाले, मला एकदाच कोरोना झाला. मी सरकारी दवाखान्यात उपचार घेत होतो. कालच माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मला जो कोरोना झाला हा ईडीची तारीख पाहून होत नाही. सन्मानीय नेते खडसे यांना ईडीची तारीख आली की कोरोना होतो आणि ते लगेच खासगी रुग्णालयात किवा घरीच क्क़ारंटीन होतात. मुंबईत फिरतात. माझे तसे नसल्याचा टोला महाजन यांनी लगाविला.