पूजा चव्हाण आत्महत्ये संदर्भातील दावे न्यायालयाने फेटाळले

पुणे: पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा यासाठी लष्कर न्यायालयात दोन खासगी दावे दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने ते दावे फेटाळले आहे. भारतीय जनता पार्टी आघाडीच्या वकील अध्यक्षा ईशाना जोशी आणि लीगल जस्टिस सोसायटीतर्फे भक्ती पांढरे यांनी खटला दाखल करण्यासाठी अर्ज केले होते. या आत्महत्या प्रकरणात राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे. त्यामुळे अद्याप या घटनेची चौकशी झालेली नाही. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावे यासाठी हे दावे दाखल करण्यात आले होते. फोटो आणि ऑडीओ क्लीप हे गुन्हा दाखल करण्यासाठी सक्षम पुरावे नाहीत, असे नमूद करीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रोहिणी पाटील यांनी हे खटले फेटाळले.
पूजा यांच्या आत्महत्येनंतर माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यासोबतचे त्यांचे फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल कराव अशी मागणी करण्यात येत होती. मात्र पोलिसांनी तिच्या घरातील व्यक्तीच तक्रार देत नसल्याने गुन्हा दाखल होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
समाज माध्यमांवर उपलब्ध असलेले फोटो आणि व्हायरल झालेले कॉल रेकॉर्डिंग यावरून गुन्हा दाखल करण्यासाठी सक्षम पुरावे नाहीत. असे न्यायालयाने नमूद केले आहे.
भाजपच्या वतीने सत्र न्यायालयात अर्ज करण्यात येणार आहे.