ऑक्सिजन टँकर ला मिळेना ड्रायव्हर,एसटी च्या ड्रायव्हर वर जबाबदारी…

Corona: ST staff rushed to the scene
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : राज्यात रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी एसटी महामंडळ पुढं सरसावलं आहे. इतर राज्यांमधून ऑक्सिजनचे टँकर आणण्याचं काम एसटीचे चालक करतील अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. तसंच आगामी काळात रस्ते वाहतूक करणाऱ्यांसाठी SOP आणणार असल्याचंही ते म्हणाले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत परब यांनी ही माहिती दिली.
राज्यात सध्या ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. इतर राज्यांमधून हा ऑक्सिजन आणण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. त्यामुळं आता तशी तयारी केली जात आहे. पण ऐनवेळी ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी ड्रायव्हर मिळत नसल्याचं संकट समोर उभं राहिलं. अशा वेळी एसटी महामंडळाच्या ड्रायव्हरच्या मदतीनं हे टँकर आणले जाणार अल्याचं परब यांनी सांगितलं. विशेष म्हणजे तातडीनं गरज असेल त्याठिकाणी ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी टँकरला ग्रीन कॉरिडोर तयार करून दिला जाईल असी माहितीही परब यांनी दिली. सध्याच्या या संकटाच्या काळामध्ये एसटी खात्यानं पूर्णपणे झोकून देत काम केल्याचंही परब यांनी सांगितलं. तसंच कोरोनामुळं एसटीलाही मोठा फटका बसल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, परब यांनी यावेळी केंद्र सरकारवरही टीका केली. ऑक्सिजन आणि रेमडेसिविरच्या पुरवठ्याचं काम केंद्राचं आहे. मग त्यांच्याकडे मागणी करावीच लागणार. राज्याला परवानगी दिली तर आम्ही त्यांना मागणार नाही, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. कुणी औषधांचा साठा, काळाबाजार करत असेल तर त्यावर कारवाई होणारच हेही त्यांनी स्पष्ट केली.
कोरोनाची पहिला लाट ओसरली पण दुसरी लाट अत्यंत तीव्र अशी आहे. त्यामुळं भविष्यात पुन्हा असे व्हायला नको म्हणून राज्य सरकार तयारी करत असल्याचं परब म्हणाले. तिसरी लाट येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळं जास्तीत जास्त लसीकरण गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं.
दुसऱ्या राज्यात कोरोनाचा प्रसार वाढायला सुरुवात झाली आहे. राज्यात आता हळू हळू वेग कमी होईल. त्यामुळं इतर ठिकाणांहून आणकी संसर्ग राज्यात येऊ नये यासाठी महामार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी लवकरच SOP जाहीर करून कडक नियम लावणार असल्याचं ते म्हणाले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *