Friday, October 7, 2022
HomeUncategorizedजिल्हाधिकाऱ्यांनी 'ती' रक्कम उदयनराजेंना केली परत

जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ती’ रक्कम उदयनराजेंना केली परत

सातारा : वाढत्या कोरोनाच्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊन विरोधात साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी भीक मांगो आंदोलन केले होते. त्या आंदोलनात साडेचारशे रुपये जमा झाले होते. ती रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आली होती. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भीक मांगो आंदोलनातील रक्कम न स्वीकारता १ ओळीचे पत्र लिहून साडेचारशे रुपयांची मनीऑर्डर खासदार उदयनराजे यांच्या घरच्या पत्त्यावर पाठवली आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊनचां निर्णय घेतला होता. यात मेडिकल, दूध केंद्र वगळता इतर सर्व गोष्टींना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याचा निषेध नोंदविण्यासाठी भाजप खासदार उदयनराजे भोसले १० एप्रिल रोजी सातारा येथील पोवई नाक्यासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर पोत्यावर बसून भीक मांगो आंदोलन केले होते. आंदोलनात उदयनराजे यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यावेळी त्यांनी थाळी फिरवत उपस्थित असणाऱ्या कडून पैसे देखील जमा केले होते. या भीक मांगो आंदोलनातून जमा झालेली साडेचारशे रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या एका तहसीलदाराला दिली होती. तसेच यावेळी त्यांनी लॉकडाऊन मागे घेण्यात यावी नाहीतर लोकांचा भडका उडले असा इशारा सुद्धा दिला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments