Friday, October 7, 2022
HomeUncategorizedदगडूशेठला अर्पण केलेला ‘तो’ सोन्याचा हार सीआयडी कडून जप्त

दगडूशेठला अर्पण केलेला ‘तो’ सोन्याचा हार सीआयडी कडून जप्त

पुणे: समृद्ध जीवनचे महेश मोतेवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड’ या कंपनीसाठी नागरिकांकडून ठेवी घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा २०१४ मध्ये चतुःशृंगी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) करण्यात येत आहे. महाराष्ट्रात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व अन्य व्यवसायाची जोड म्हणून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचं आमिष दाखवत मोतेवार यांनी शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. यामुळेच त्यांच्यावर विविध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल आहे. दरम्यान सध्या मोतेवार हे ओरिसा कारागृहामध्ये आहेत या प्रकरणी त्यांचा सीआयडी तपास सुरू आहे.

समृद्ध जीवनचे महेश मोतेवार यांनी पुण्याच्या प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीला अर्पण केलेला सव्वा किलोचा सोन्याचा हार सीआयडी ने जप्त केला आहे. दरम्यान या हाराची किंमत ६० लाख पर्यंत असण्याचा अंदाज आहे.आता हा हार दगडूशेठ गणपती मंदिराच्या ट्रस्टने सीआयडीकडे दिला आहे. शेतकरी, कष्टकरी यांना फसवून मिळवलेल्या पैशामधून मोतेवार यांनी हार बनवला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सीआयडीने त्यावर जप्ती आणली आहे.

महेश मोतेवार यांच्यावरील आर्थिक गुन्ह्यांच्या, आरोपांचा तपास सीयडीची आर्थिक गुन्हे टीम करत आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक करून आलेले पैसे पुन्हा कुठे गुंतवले याचा शोध सध्या सुरू आहे. या तपासामध्येच सीआयडीला दगडूशेठ गणपतीला मोतेवारांनी दान केलेल्या हाराची लिंक सापडली आणि आता तो हार जप्त करण्यात आला आहे.

‘आम्हाला एक फोटो सापडला ज्यामध्ये त्याने दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला एक सोन्याचा हार अर्पण केल्याचं दिसत होतं. त्यानुसार हा हार आज जप्त करण्यात आला आहे’, अशी माहिती सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली आहे. ‘मोतेवारने दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला अर्पण केलेला सोन्याचा हार शेतकरी आणि इतर गुंतवणूकदारांची फसवणूक करुन घेतलेल्या पैशातून हा हार खरेदी केला होता’, असंही अतिरिक्त पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments