मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधून करणार मोठी घोषणा

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुकच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधणार आहे. यावेळी ते काय घोषणा करणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. रात्री साडे आठ वाजता ते जनतेशी संवाद साधणार आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. साधारण १५ दिवसांचा लॉकडाऊन लागण्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहे. उद्या मध्यरात्री पासून ते ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन लागण्याची चिन्हे आहेत.
लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही स्पष्ट संकेत दिले होते. गेल्या आठवड्या पासून मुख्यमंत्री बैठका घेवुन विरोधीपक्षासह सर्वाना विश्वासात घेत आहे. टास्क फ़ोर्सशी चर्चा झाली. लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले होते.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. त्याबाबत नियमावली आज जाहीर होईल. परप्रांतीयांना घरी जाण्यासाठी अडवत नसल्याचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊन मध्ये जिल्हाबंदी असेल असेही सांगीतले. लॉकडाऊन निर्णय झाल्यावर दोन दिवसांनी ती लागू होईल. लोकांना तयारी करण्यासाठी वेळ दिला जाणार असल्याचे १५ ते ३० एप्रिल असा लॉकडाऊनचा कालावधी असणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.