फोन टॅपिंग वरून मुख्यमंत्र्यांचा संताप म्हणाले, फडणवीस यांचा आरोप मोडून काढू
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांचा लेटर बॉम्ब, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोन टॅपिंग वरून केलेले आरोप यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. या सर्व प्रकरणाचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन टॅपिंग प्रकरणात संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडल्याची कबुली त्यांनी यावेळी त्यांनी दिली. जर ते फोन टॅप करत असतील तर कसे काम करायचे आणि त्या अधिकाऱ्यावर विश्वास कसा ठेवायचा. असा प्रश्न त्यांनी बैठकीत उपस्थित केला. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप आपण एकजुटीने खोडून काढले पाहिजे असेही ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान हा गृहमंत्री अनिल देशमुख हे कॅबिनेट बैठकीत उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणाची सर्व माहिती दिली. काही अधिकाऱ्यांनी गंभीर चुका केल्या असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असेही देशमुख यांनी सांगितले. अशी माहिती नवाब मलिक यांनी माध्यमांना माहिती दिली.
तर गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले. रश्मी शुक्ला यांनी ऐकाच्या नावाची परवानगी घेवून दुसऱ्याचा फोन टॅप केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यात कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.