लता मंगेशकर यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

मुंबई : राज्य कोरोना महामारीच्या मोठ्या संकटातून जात आहे. यामध्ये राज्यात मोठ्या आर्थिक अडचणी सुद्धा येत आहे. त्या पार्श्वभूमी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आवाहन केले आहे. दरम्यान कोविड-१९ साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भारतरत्न लता मंगेशकर यांनी आज सात लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
कोविड-१९ विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड १९ मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. राज्यात ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा यासारख्या समस्य़ा निर्माण झाल्या आहेत.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ तुम्हाला मदत करायची असल्यास…
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करणाऱ्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.