साताऱ्याचा चारुदत्त साळुंखे UPSC-IES परीक्षेत देशात पहिला

मुंबई: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा (२०२०) निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत Mechanical Engineering विभागात कराडचा चारुदत्त मोहन साळुंखे देशात पहिला आला आहे. या यशाबद्दल त्याच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे.
चारुदत्त साळुंखे हा भाभा रिसर्च सेंटर मध्ये संशोधक म्हणून काम करतो. त्याच्यावर स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. मुळचे चाफळ (ता. पाटण, जि. सातारा) सारख्या ग्रामीण भागातून येऊन दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. चारुदत्त साळुंखे याचे प्राथमिक शिक्षण आदर्श प्राथमिक विद्या मंदिर कराड येथे झाले, पुढे दहावी पर्यंत शिक्षण शिवाजी हायस्कूल कराड येथून पुर्ण झाले. दहावीला ९४.५५ टक्के मिळाले होते. तर बारावी SGM महाविद्यालय येथे झाली. ९२.३३ टक्के मिळाले. तर पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजीनिअरिंगची पदवी मिळाली.
चारुदत्त साळुंखे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजीनिअरिंगची पदवी मिळाल्या नंतर अनेक खासगी कंपनीत नोकरीची संधी होती. मात्र, चारुदत्तणे शासकीय सेवेत अधिकारी होण्याच स्वप्न पाहिलं होत. GATE २०२० या परीक्षेत संपूर्ण देशातून ४८ वा क्रमांक मिळत यश प्राप्त केल होत. या परीक्षेवर चारुदत्त साळुंखे याची भाभा अणुसंशोधन केंद्राच्या संशोधक पदाच्या मुलाखतीत निवड झाली. UPSC-IES ची परीक्षा पास झाला आहे. दरम्यान त्याची भाभा अणुसंशोधन केंद्रात संशोधक म्हणून निवड झाली आहे. याच बरोबर UPSC च्या मुलाखतीसाठी तो पात्र ठरला आहे.