कोरोनाशी दोन हात करण्यासाठी केंद्राने SDRFला दिला ‘इतक्या’ रुपयांचा पहिला हप्ता

मुंबई : कोरोनाचा संसर्ग संपूर्ण देशभरात त्सुनामी सारखा पसरत आहे. त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांची सुद्धा परिस्थिती गंभीर होत चालली आहे. काही राज्यात कडक निर्बंध आहेत तर काही ठिकाणी कडक लॉकडाऊन सुद्धा लावण्यात आले आहे. त्यामुळे या परिस्थिती अंतर्गत केंद्र सरकारने राज्य सरकारला मदतीचा हात दिला आहे. २०२१-२२ साठी अर्थमंत्रालयाने आपत्ती निधीचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. ८८७३.६ कोटींची मदत ही राज्य आपत्ती प्रतिसाद निधीला दिली आहे. या संपूर्ण रकमेतील ५० टक्के रक्कम ही कोरोना काळासाठी त्याला नियंत्रणात आणण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
हा निधी साधारणता जून महिन्यात दिला जातो. मात्र यावेळी कोरोनाची स्थिती बघता हा निधी मे महिन्यातच जारी करण्यात आला आहे. यापैकी ५० टक्के म्हणजेच ४३६.८ कोटी रुपये कोरोना परिस्थिती मध्ये वापरण्यात येणार आहेत. आणि हा संपूर्ण निधी रुग्णालय, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणावर वापरण्यात येणार आहे.
1st instalment of Rs. 8873.6 crore for State Disaster Response Fund (SDRF) released in advance
— PIB India (@PIB_India) May 1, 2021
Up to 50% of the SDRF amount can be used by the States for COVID-19 containment measures
Details here: https://t.co/kubLd20QlU
महाराष्ट्रातील एकंदरीत वाढत्या रुग्णांची संख्या बघता हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ही रक्कम एक महिन्या आधीच जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे या निधीचा रुग्णालयातील वैद्यकीय उपकरण, ऑक्सिजन यासाठी वापर करता येणार आहे.