Wednesday, September 28, 2022
Homeब-बातम्यांचावाझे यांच्या कडून जप्त केलेली कार फडणवीस यांच्या गुडबुक्स मधल्या बिल्डरची?

वाझे यांच्या कडून जप्त केलेली कार फडणवीस यांच्या गुडबुक्स मधल्या बिल्डरची?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आरोप

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेले वाहन सापडले होते. या प्रकरणात एनआयएने वादग्रस्त पोलीस अधिकार सचिन वाझे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहे. दररोज नवीन खुलासे होत आहेत. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास ATS करत आहे. त्यांनी आता पर्यंत दोघांना अटक केली आहे.

            मंगळवारी ATS ने सचिन वाझे हे वापरत असलेली एक वोल्वो कार दमन येथून जप्त केली आहे. ही कार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याच्या जवळील मनिष भतीजा यांची असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे.  

            ATS आणि फोरेन्सिक टीम कडून या कारची तपासणी करण्यात येत आहे. ही कार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुक्स मधील बिल्डरची असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. तशी फेसबुक पोस्ट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेज वरून करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची फेसबुक पोस्ट

एटीएसच्या तपासामुळे कहानी में ट्विस्ट

महाराष्ट्र एटीएसने जप्त केलेली व्होल्वो मनिष भतिजांची?

मनिष भतिजा देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुक्समधले बिल्डर.

मनसुख हिरेन तपासात महाराष्ट्र एटीएसच्या नव्या सुगाव्यामुळे ‘कहानी में ट्विस्ट’ आला आहे. एटीएसने तपासादरम्यान जी व्होल्वो कार ताब्यात घेतली आहे ती बिल्डर मनिष भतिजा यांची असल्याचे समजते. मनिष भतिजा यांचे राजकीय व व्यावसायिक लागेबांधे भाजपा नेत्यांकडे जातात.

मनिष भतीजा प्रसाद लाड यांचे व्यावसायिक पार्टनर

याच मनिष भतिजा यांच्या पॅराडाइज ग्रुपला फडणवीस मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळानजीकची सोन्यासारखी २४ एकर प्राइम लँड पडेल त्या भावाने दिली होती. इतका हा मनिष भतिजा फडणवीसांच्या जवळचा आहे आणि फडणवीसांचे अत्यंत लाडके ज्यांना त्यांचा ब्लू आइड बॉय म्हणून ओळखले जाते त्या प्रसाद लाड यांचे हे मनिष भतिजा व्यावसायिक पार्टनर असल्याचे समजते.

नवी मुंबईतील सुमारे १७६७ कोटी रुपयांची ही जमीन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या ३.६ कोटी रुपयांत मनिष भतिजा यांच्या घशात घातली, असा आरोप सातत्याने झाला होता. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली होती.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माध्यमांमध्ये वेगवेगळ्या राजकीय भूमिका उठत असताना पोलिस तपासात मात्र वेगळी तथ्ये सामोरी येत आहेत. या प्रकरणातले इतर पुरावे आता महाराष्ट्र पोलिसांच्या तपासामुळे बोलू लागले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments