Friday, October 7, 2022
Homeब-बातम्यांचापंढरपूरच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूकीचे बिगुल वाजले

पंढरपूरच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूकीचे बिगुल वाजले

निवडणूक बिनविरोध होणार?

पुणे: पंढपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भारत भालके यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख घोषित केली आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार का? राष्ट्रवादीत कोणाला तिकीट मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत अनेक नावे चर्चेत आहेत. दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे चिरंजीव आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व आवताडे समुहाचे सर्वेसर्वा समाधान आवताडे, युटोपीय साखर कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, शिवसेना महिला नेत्या शैला ताई गोडसे, डी.व्ही.पी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अभिजित पाटील यांचे नाव या मतदारसंघात चर्चेत आहेत.

दरम्यान, निवडणुकीसाठी अनेक नेत्यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असल्याचे समोर आले आहे. समाधान आवतडे यांनी काढलेली ‘सुसंवाद यात्रा’ काढली तर भगीरथ भालके यांनी नुकतीच काढलेली ‘जनसंवाद यात्रा’ तर दुसऱ्या बाजूला, अभिजीत पाटील यांच्याकडून सुरू झालेल्या क्रीडा स्पर्धा, तसंच विविध सामाजिक उपक्रम या सर्व माध्यमातून या नेतेमंडळींची जनतेच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू असल्याचे बोलले जात आहे.

पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघासाठी भाजप पदाधिकऱ्यांनी नुकतीच एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पोटनिवडणूक बिनविरोध न होऊ देता, उमेदवार देण्याची घोषणा भाजपच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती आहे. पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आमदार प्रशांत परिचारक यांचे पुतणे प्रणव परिचारक यांच्या नावाची चर्चा होत असल्याची माहिती आहे.

 निवडणूक आयोगानं जाहीर केला असून १७ एप्रिल २०२१ रोजी मतदान होणार असून २ मे ला मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात २३ मार्चला नोटिफिकेशन जारी होणार असून. २३ मार्च ते ३० मार्च दरम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असणार असून यावेळी उमेदवारांना आपला अर्ज दाखल करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ३१ मार्चला या अर्जाची छाननी केली जाईल तसेच ३ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमात दिली गेली आहे. विधानसभा पोटनिवडणुकीचं मतदान १७ एप्रिल रोजी तर मतमोजणी २ मे २०२१ ला पार पडणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments