Tuesday, October 4, 2022
HomeZP ते मंत्रालयक्रांतिसिंह पाटलांना वाट दाखवणारा मुलगा पुढे साहित्यरत्न, लोकशाहीर झाला...

क्रांतिसिंह पाटलांना वाट दाखवणारा मुलगा पुढे साहित्यरत्न, लोकशाहीर झाला…

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. जनसामान्यांचा आवाज त्यांनी आपल्या लिखाणातून मांडला. शाहीर, कथा, कादंबरीकार अशा अनेक भूमिकांतून त्यांनी वंचितांच्या आवाजाला बुलंदी दिली. समाजातील तळागाळातील शेवटच्या माणसाच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिला. तसेच त्यांच्या वेदनांचा हुंकार आपल्या साहित्यातून मांडला.

समाजातील शेतकरी, पददलित, श्रमिक घटकाला आपल्या शाहिरी बाण्यातून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण केली.

पण कधीकाळी अण्णाभाऊ साठेंनी क्रांतिसिंह नाना पाटील वाट दाखविण्याचे काम केले होते.

इंग्रज सरकारच्या काळात प्रतिसरकारचा प्रयोग यशस्वी करुन दाखविला तो नानांनी. इंग्रज शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा त्यांचा विचार होता. पुढे नानांनी यावर काम करून ‘आपुला आपण करू कारभार’ या सूत्रानुसार, प्रती सरकार अंमलात आणलं. तो काळ होता १९४२ चा.

यामुळे नानांना इंग्रजांच्या मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं. इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. १९४२ ते १९४६ ते भूमिगत होते. पण नाना हाती लागले नाहीत.

पण यागोदर १९२० ते ४२ याकाळात ते ८ ते १० वेळा जेलमध्ये जाऊन आलेले. याच दरम्यान, नानांनी अटकेत असताना रेल्वेतून थेट कृष्णेच्या पात्रात उडी मारमारून इंग्रजांच्या हाती तुरी दिल्या होत्या.

इंग्रजांविरुद्ध कारवाया करायच्या अन भूमिगत व्हायचे हे नित्याचेच झाले होते. एकदा झाले असे की, सांगली जिल्ह्यातील रेठरे भागात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी तुफान सेनेचा एक कार्यक्रम घेतला होता.

नानांची सभा सुरु असतानाच इंग्रजांना त्यांचा सुगावा लागला. सभास्थळी इंग्रज येत आहेत, असे समजताच. नानांनी आपल्या सहकार्यांसह भूमिगत होण्यासाठी घोड्यावर बसून जंगलाच्या दिशेने घोडदौड सुरु केली.

काही अंतर कापल्यानंतर नानांनी वळून मागे बघितले. त्यावेळी एक लहान मुलगा जीवाच्या आकांताने घोड्यांमागे पळत होता. म्हणून नानांनी थांबून त्या मुलाला विचारले ? आरं कोण तू ? कुठं आमच्या मागं पळतुयास?? त्यावर तो मुलगा म्हणाला. मी तुमच्या मागं न्हाई पळत, पुढ जंगल हाय. तुम्हासनी वाट घावायची न्हाई, मला माहित हाय. मी दावतो, असं म्हणाला.

आणि पुढेच हा मुलगा थोर साहित्यरत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे झाला ज्याने रशियात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा गायला.

रेठरे गावातील नानांच्या भाषणामुळे अण्णाभाऊ साठे प्रभावित झाले आणि पुढे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली.

अधिक वाचा :

या दोन पाटलांनी कृष्णेच्या पात्रात उड्या घेवून इंग्रजांना तुरी दिलेल्या…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments