Saturday, October 1, 2022
Homeराजकीयभाजप चित्रपट आघाडीच्या पुणे शहराध्यक्षाला अटक

भाजप चित्रपट आघाडीच्या पुणे शहराध्यक्षाला अटक

पुणे: बँकेमध्ये असलेल्या डोरमंट (निष्क्रिय खाते) खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे अब्जावधीची फसवणूक करणारी आंतरराज्य टोळीला सायबर पोलिसांनी अटक केलीये. यात एका महिलेसह ८ जणांचा समावेश आहे. भाजपाचे चित्रपट आघाडीचे शहराध्यक्ष व अभिनेते रविंद्र मंकणी यांचा पुत्र रोहन मंकणीचाही त्यात समावेश आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या आरोपींपैकी ४ जण आयटी इंजिनिअर आहेत. या सर्वांनी संगनमत करून आयसीआयसीआय, एचडीएफसी व इतर बँकेतील डोरमंट खात्याचा डेटा मिळवला. या सर्व खात्यात जवळपास २ अब्ज १६ कोटी २९ लाख रुपये होते. या टोळीत अनेक मोठ्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

काही बॅंकांच्या देशभरातील खातेदारांची गोपनीय माहिती चोरुन या माहितीची विक्री करण्याचा मोठा डाव पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने हाणून पाडला. या डेटा चोरी आणि विक्री करण्याच्या प्रयत्नातून खातेदारांच्या खात्यातून जाणारे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये पोलिसांमुळे वाचले. या प्रकरणामध्ये सायबर पोलिसांनी २५ लाख रुपये स्वीकारताना १० जणांना अटक केली असून अन्य काही जणांची चौघांची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी चौघे जण नामांकित कंपन्यांमध्ये संगणक अभियंते म्हणून कार्यरत आहेत.

रोहन मंकणी प्रसिद्ध चित्रपट-टीव्ही अभिनेते रवींद्र मंकणी यांचे सुपुत्र असून अभिनय क्षेत्रात सुद्धा ते सक्रिय आहेत. रवींद्र मंकणी यांच्या स्वामी, सौदामिनी, अवंतिका, शांती, बापमाणूस अशा मालिका गाजल्या आहेत. तर निवडुंग, स्मृतीचित्रे, नॉट ओन्ली मिसेस राऊत अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या आहेत. रोहन मंकणी हा भाजपच्या चित्रपट आघाडीचा पुणे शहराध्यक्ष आहे तसंच राजकीय विश्लेषक आणि सल्लागार अशी ट्विटरवर त्याची ओळख आहे. तो फूड अँड वाईन इव्हेंट्सचे आयोजन करत असल्याचीही माहिती आहे. ३७ वर्षीय रोहन मंकणी पुण्यातील सहकारनगर भागात वास्तव्यास आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments