Friday, October 7, 2022
Homeब-बातम्यांचाकोरोना रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात

कोरोना रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात

कोरोना रुग्ण असल्यामुळे कोणीही केली नाही मदत

पुणे : कोरोना बाधित रुग्णाला वाईकडे घेऊन जात असताना रुग्णवाहिकेचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात घडला असून घटना स्थळी खंडाळा पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आहे. हा अपघात रुग्णावाहिकेवरील चालकाचा ताबा सुटल्याने झाला असून यामधील रुग्णाला रुग्णावाहिकेमध्येच मार लागला आहे. हा रुग्ण भोर येथील असून त्यास ऑक्सीजन लावून रुग्णावाहिके द्वारे वाई येथे हलविण्यात येत होते मात्र मधेच हा अपघात झाला.

याबाबात सविस्तर वृत्त असे की, एमएच ०१ बीएस ०११३ क्रमांकाची मी सातारकर प्रतिष्ठान खंडाळा अशा नावाची रुग्णवाहीका भोर येथील एका कोरोना रुग्णाला पुढील उपचारासाठी वाई येथे घेऊन जात होती. दरम्यान पुणे-सातारा महामार्गावर असणाऱ्या खंबाटकी घाटाजवळ या रुग्णवाहिकेचा अपघात डोंगर कड्यावर आदळून ती पलटी होऊन झाला. रुग्णवाहिका चालकाचे नाव सागर अलगुडे असून यांचा रुग्णवाहिका भरधाव वेगात असल्यामुळे तिच्यावरचा ताबा सुटल्याने प्रथम दर्शनी समोर आले आहे. रुग्णवाहिकेमधील रुग्ण मदतीची हाक देत होता मात्र कोरोना रुग्ण त्यात ऑक्सीजनची कमी यामुळे या रुग्णाचा आवाज बाहेर जात नव्हता त्यामुळे मार लागलेल्या अवस्थेमध्ये हा रुग्ण रुग्णवाहिकेमध्येच पडून राहीला. तसेच कोरोना रुग्ण असल्यामुळे या अपघात ग्रस्त रुग्णास मदत करण्याचे कोणीच धाडस केले नाही. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलिस व महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पर्यायी रुग्णावाहिका बोलावून या रुग्णाच वाई येथे हलविण्यात आले. या अपघाताची तक्रार खंडाळा पोलिसात नोंदविण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments