६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर, कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

दिल्ली: मागच्या वर्षी कोरोनामुळे राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली नव्हती. बऱ्याच प्रतिक्षेनंतर आज ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 

जाहीर झालेले पुरस्कार एक वर्ष उशीराने घोषित होत आहे. हे पुरस्कार केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून जाहीर होत असतात. तसेच, या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते केले जाते.

आज ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात २०१९ मध्ये रिलीज चित्रपटांना पुरस्कार देण्यात आला आहे. यात नितेश तिवारी दिग्दर्शित आणि दिवंगत सुशांत सिंह राजपूत, श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असणाऱ्या ‘छिछोरे’ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा मान मिळाला आहे.

तमिळ अभिनेता धनुष आणि बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार तर कंगना रानौतने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.अभिनेत्री कंगना रानौतला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’साठी हा पुरस्कार मिळाला आहे. कंगनाचा हा करिअरमधील चौथा राष्ट्रीय पुरस्कार आहे.

६७ व्या राष्ट्रीय चित्रपट जाहीर झालेले पुरस्कार खालीलप्रमाणे:

 • बेस्ट फीचर फिल्म (हिंदी) – छिछोरे – डायरेक्टर- नितेश तिवारी
 • बेस्ट ॲक्ट्रेस – कंगना रानौत (फिल्म मणिकर्णिका, पंगा )
 • बेस्ट ॲक्टर – मनोज बाजपेयी, धनुष           
 • बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर -विजय सेतुपती          
 • बेस्ट सिंगर – बी प्राक ( तेरी मिटटी- केसरी)
 • बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस – पल्लवी जोशी         
 • बेस्ट एडिटिंग – जर्सी (तेलुगू)         
 • बेस्ट ऑटोबायोग्राफी – खासी        
 • बेस्ट स्क्रीनप्ले अडॉप्टेड – गुमनामी  
 • बेस्ट सिनेमॅटोग्राफी – जलीकट्टू      
 • बेस्ट फीमेल सिंगर – बार्दो 
 • बेस्ट फिल्म क्रिटिक – सोहिनी चट्टोपाध्याय   
 • मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट – सिक्कीम  
 • बेस्ट नॉन फीचर फिल्म – वाइल्ड कर्नाटक

यंदा एकूण ४६१ फिचर फिल्म्स राष्ट्रीय पुरस्कारांच्या शर्यतीत पोहोचल्या होत्या. २०२१ मधील ‘मोस्‍ट फ‍िल्‍म फ्रेंडली स्‍टेट’ या श्रेणीतील पुरस्कारासाठी १३ राज्य सहभागी झाली होती. सिक्किमने या शर्यतीत बाजी मारली आहे. चित्रपटगृहात रिलीज झालेला ‘छिछोरे’ हा सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरला. दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा हा चित्रपट प्रेक्षकांनाही प्रचंड आवडला. तर नॉन फिचर चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हिंदी चित्रपट ‘ ॲन इंजिनियर्ड ड्रीम’ला मिळाला. याचं दिग्दर्शन हेमंत गावा यांनी केलं आहे. स्पेशल मेंशन पुरस्कारांमध्ये चार चित्रपट ‘ब‍िर‍ियानी’, ‘जोना की पोरबा’ (आसम‍िया), ‘लता भगवान करे’ (मराठी), ‘प‍िकासो’ (मराठी) यांनी बाजी मारली आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *