KKR च्या ‘या’ २ खेळाडूंना कोरोनाची लागण, कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना स्थगित !

2 KKR players infected with corona, Bangalore match against Kolkata postponed!
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : देशभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाची स्थिती भयंकर असतानाच आता क्रिकेट विश्वातून मोठी बातमी येत आहे. कोलकाता विरुद्ध बंगळुरू आज होणारा सामना तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. हा सामना आज होणार होता. सामन्याआधी कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे तात्पुरता आजचा सामना स्थगित करण्यात आला असून तो रिशेड्युल करण्यात येणार आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार कोलकाता संघातील वरून चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या दोघांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोलकाता संघातील दोघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे आजचा सामना रिशेड्युल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
बीसीसीआय अधिकाऱ्य़ांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप आणि वरून या दोघांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील खेळाडूंची देखील चिंता वाढली आहे. आजचा होणारा सामना रद्द करण्यात आला असून तो रिशेड्युल करण्यात येणार आहे. तो सामना कधी रिशेड्युल होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
दोन्ही खेळाडूंना आयसोलेट करण्यात आलं असून कोलकाता संघातील सर्व खेळाडूंची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. याशिवाय आता पुढच्या सामन्यांबाबत काय निर्णय येणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघातील आर अश्विनने देखील त्याच्या कुटुंबियांना कोरोना झाल्यामुळे आयपीएलमधून ब्रेक घेतला होता. देशात कोरोनाची स्थिती सध्या अत्यंत भयानक आहे. सामन्यादरम्यान शिरकाव केलेल्या या कोरोनानं सर्वांचंच टेन्शन वाढवलं आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पडसाद
पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL) दरम्यान देखील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानं संपूर्ण स्पर्धा पुढ ढकलण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) घ्यावा लागला होता. तसंच इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका ही मालिका देखील कोरोनामुळे अर्धवट स्थगित झाली होती. दक्षिण आफ्रिकेतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे ऑस्ट्रेलियन बोर्डानं दक्षिण आफ्रिका दौरा काही महिन्यांपूर्वी रद्द केला होता.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *