दसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदेंना भांडू द्या, पण… राष्ट्रवादीचा शिवसैनिकांना मोलाचा सल्ला

अंकुश काकडे
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंचे एकेक निष्ठावंत शिलेदार आपल्याकडे खेचला. शिवसेना पक्षावर दावा ठोकला त्यानंतर आता दसरा मेळाव्याची परंपरा देखील चालविण्याचा निर्धार केल्याचे पाहायला मिळते.

त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट दसऱ्या मेळाव्यामुळे आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा पार पडेल.

पहिल्यांदाच मुंबईत शिवसेनेचे दोन दसरे होत असून गर्दी जमविण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. शिंदे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची भूमिका घेतली होती. पुढे हा वाद कोर्टात गेला होता.

त्यामुळे दसरा मेळाव्यावरून शिंदे गटात व शिवसेनेतील संघर्ष पेटल्याचे दिसले. दोन्ही गटातील नेत्यांची शाब्दिक चकमक देखील चर्चेचा मुद्दा असतो.

या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याच्या चौकटीत राहून आपले भाषण करावे, अन्यथा कायदा काम करेल, अशी तंबी भडकाऊ भाषण करणाऱ्या नेत्यांना दिली आहे.

तसेच शरद पवार यांनीही दोन्ही गटांना मर्यादा ओलांडू नका. कटुता वाढेल असे बोलू नका, असा जेष्ठत्वचा सल्ला दिला आहे.

शरद पवारांचा हाच कित्ता गिरवत शरद पवार यांचे विश्वासू सहकारी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी आपले मत मांडले आहे. दसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदे काय भांडायचे ते भांडूद्यात पण मेळाव्याला जाणाऱ्यानां विनंती तुम्ही आपापसात भांडू नका, असा सल्ला त्यांनी दिला आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *