Monday, September 26, 2022
Homeब-बातम्यांचाखंडणी प्रकरणात ठाकरे सरकार, नवनीत राणा यांचा आरोप

खंडणी प्रकरणात ठाकरे सरकार, नवनीत राणा यांचा आरोप

परमबीर सिंहांच्या पत्रावरून लोकसभेत खडाजंगी

दिल्ली: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ माजली असताना लोकसभेतही त्याचे पडसाद उमटले आहेत. यावेळी या प्रकरणावरून  शिवसेना आणि भाजप खासदार एकमेकांशी भिडले. निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटींची हप्तेवसुली करण्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. दरम्यान याप्रकरणी अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे. खंडणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही हात असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

“माझे सहकारी महाराष्ट्रात खंडणी वसुली करण्याचं काम सुरु आहे सांगत आहेत. जो व्यक्ती १६ वर्ष निलंबित होता, सात दिवस जेलमध्ये राहिला त्याला कोणत्या आधारे पुन्हा सेवेत घेतलं. जेव्हा भाजपाचं सरकार होतं तेव्हा फडणवीसांनी यासाठी स्पष्ट नकार दिला होता. ज्यादिवशी ठाकरे सरकार आलं तेव्हा सर्वात आधी सचिन वाझेंना सेवेत घेतलं. सचिन वाझेंमुळे परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली,” असं नवनीत राणा यांनी सांगितलं.

“मला सांगायचं आहे की महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच हे सगळं सुरु आहे. बदल्या करणं, खंडणी वसुल करणं यामध्ये इतर कोणीही सहभागी नाही. एकट्या मुंबईतून महिन्याला १०० कोटी वसुली होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती होत असेल?”, अशी विचारणा नवनीत राणा यांनी यावेळी केली.

यावेळी भाजपचे पुण्याचे खासदार गिरीष बापट यांनी देखील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली.

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देशमुख यांच्या विरोधात लिहलेल्या पत्रावर चर्चा झाली. या चर्चेवेळी शिवसेना आणि भाजप खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. भाजप खासदार गिरीष बापट, पूनम महाजन आणि अमरावतीच्या खासदार नवनीत कौर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शिवसेना आमदारांनी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप खासदारांनी आवेशपूर्ण हे प्रकरण सभागृहासमोर मांडले.

यावेळी बोलताना खासदार पुनम महाजन यांनी अनिल देशमुख वसूल करत असलेल्या खंडणीचे वार्षिक गणित मांडले. जर मुंबईच्या एका एसपीला देशमुख हे महिन्याचे १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्यास सांगत असतील, तर त्याची वार्षिक वसूलीची किमंत किती होते ? असा सवाल त्यांनी केला. यावेळी खासदार नवनीत कौर यांनीही राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments