दहावी, बारावीची परीक्षा होणारच

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता यंदा दहावी, बारावीची परीक्षा रद्द होतील किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील अशी चर्चा करण्यात येत होती. मात्र या चर्चेला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पूर्ण विराम दिला आहे. दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा जाहीर केलेल्या तारखेलाच ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मुलांचे आरोग्य, सुरक्षा याकडे सरकारचे प्राथमिक लक्ष असणार आहे अशी माहिती सुद्धा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
तसेच आठवी, नववीच्या परीक्षेबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. नोव्हेंबर मध्ये बोर्डाचा पेपर पॅटर्ण ठरतो त्याची तपासणी कशी करायची हे ठरते. गावखेड्यात पेपर पोहचायला दोन महिने लागतात. असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
पुढच्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या यावर्षीचा पाया मजबूत होणे गरजेचे आहे. यामुळे शिक्षण सुरु राहणे गरजेचे आहे. कोरोनामुळे अनेक शाळा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी यांची ऑनलाईन शिकवणी सुरु आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.
बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते १ मे दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे.