दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार
मुंबई : वाढत्या कोरोनाची बाधितांची संख्या पाहता दहावी- बारावीच्या परीक्षा बाबत गोंधळ निर्माण झाला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. दहावी- बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहे. प्रॅक्टिकल परीक्षेत काही बदल करण्यात आली आहे. दहावी-बारावी ची लेखी परीक्षा झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात येईल.
गायकवाड म्हणाल्या, परीक्षा अर्धातास अलीकडे घेण्यात येईल. तसेच विद्यार्थांना पेपर सोडविण्यासाठी अधिकचे ३० मिनिटे देण्यात येणार आहे. सकाळी ११ ऐवजी १०.३० वाजता पेपर सुरु होईल. या वर्षी लेखण सराव कमी झाल्याने अर्धातास वाढून देण्यात आली आहे. विद्यार्थांना कोरोन झाल्यास जून मध्ये पुन्हा एकदा परीक्षा घेण्यात येईल
अनेक जणांनी यंदा दहावी- बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी केली होती. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण आदी भागातील परिस्थितीचा विचार करता परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
कोरोनामुळे परीक्षा ज्या शाळेत तुम्ही शिकता त्या शाळेत, महाविद्यालयात होणार आहे. जर वर्ग कमी असेल तर बाजूच्या शाळेत बैठक व्यवस्था करण्यात येईल असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले. यंदा ८० मार्काच्या पेपरसाठी ३० मिनिटे वाढून देण्यात येणार आहे तर ५० मार्काच्या पेपरसाठी १५ मिनिटे अधिकची देण्यात येणार आहे.
१० वी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होईल.
काही दिवसापूर्वी दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रक बोर्डाने जाहीर केले आहे. यात १० वी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे. तर १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार आहे.