टेलीफोन बूथचा ऑपरेटर ते वास्तवदर्शी अभिनयाचा सम्राट; विजय सेतुपती

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

तामिळ सिनेसृष्टीत खलनायकाच्या भूमिका साकारणारा व्हर्सेटाइल अभिनेता विजय सेतुपति याचा आज ४५वा वाढदिवस आहे. विजय ने अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी रिटेल स्टोरमध्ये त्याने सेल्समन काम केले, फास्टफूड जॉईंटवर कॅशियर आणि फोनबुथ ऑपरेटरच सुद्धा काम त्याने केले आहे. सामान्य प्रेक्षक म्हणून चित्रपटगृहात जाताना काय विचार करतो? चित्रपटाला कथा असावी, उत्तम अभिनय, नायक आणि अश्याच काही गोष्टी. सेतुपतीच्या चित्रपटात प्रेक्षकांना हे सर्व अनुभवायला मिळते. त्याच्या वाढदिवस निमित्त चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय.

विजय सेतुपतीने त्याच्या अभिनयाची सुरुवात पार्श्वअभिनेता म्हणून केली होती. चित्रपटात नायक म्हणून काम करायच्या आधी सेतुपतीने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका केल्या होत्या. सेतुपतीला नायक म्हणून पहिला ब्रेक दिला सिनु रामासामीयांनी. ‘थेनमुर्क परुवाकाटरू'(२०१०) हा सिनेमा खऱ्याअर्थाने सेतुपतिचा पहिला सिनेमा. पण, एखाद्या चित्रपटात मुख्य अभिनेता होण्यापर्यंतचा विजयचा प्रवास सोपा नव्हता.
     
विजय सेतुपती इयत्ता ६वी मध्ये असताना चेन्नई मध्ये स्थायिक झाले. विजय पूर्वीपासून ‘बिलो ऍव्हरेज’ विद्यार्थी होते. स्पोर्ट्स किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये किंचित मात्रही रस त्यांना नव्हता. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर विजय खर्चपाणी भागविण्याकरीता काम करायला सुरुवात केली.

अभिनयक्षेत्रात पदार्पणपूर्वी केलेत हे काम

विजय ने अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी रिटेल स्टोरमध्ये त्याने सेल्समन काम केले, फास्टफूड जॉईंटवर कॅशियर आणि फोनबुथ ऑपरेटरच सुद्धा काम त्याने केले. त्यानंतर विजय दुबईला नोकरीसाठी गेले पण इच्छेनुसार काम नसल्यामुळे, काहीवर्षात परत भारतात आले.  2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या थेनमुर्क परुवाकाटरू या चित्रपटामध्ये पहिल्यांदा विजय सेतुपति यांना मोठा रोल मिळाला. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ऑरेंज मिठाई या चित्रपटाचं विजय सेतुपतीनं लेखन आणि निर्मितीहि केली आहे.        

 विजय सेतुपतीने स्वतःच्या कामाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. विजयचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तर काहींनी प्रेक्षकांवर प्रभाव टाकला. ९६, मास्टर, कधलुम कदंधु पोगम, इरावी, विक्रम वेधासारखे चित्रपट लोकप्रिय झाले. ९६ चित्रपटाच्या प्रसिद्धीने त्याच तेलगू आणि कन्नड मध्ये देखील रिमेक करण्यात आले.

तामिळ सुपरस्टार विजय थालापतीने “मास्टर” चित्रपटा मध्ये साकारलेल्या नायकाला सर्वात उत्कृष्ट टक्कर सेतुपतिने खलनायाकाच्या भूमिकेत दिली. या दोघांच्या अभिनयाने चित्रपटाला एक नवीन डायमेंशन दिली. चाहत्यांनी देखील मास्टर चित्रपटाला भरभरून प्रेम दिले आणि रिलीजच्या वेळी जागतिक बॉक्स ऑफिसवर पहिला क्रमांक पटकावणारा हा पहिला भारतीय चित्रपट देखील ठरला.

विजय सेतुपतिला  ‘दशकातले सर्वोत्तम अभिनयासाठी’ विजय देवराकोंडा, रणवीर सिंग आणि इतर कलाकारानंसोबत प्रसिद्ध पत्रकार अनुपमा चोप्रासोबत मुलाखतीला बोलवले होते. विजय सेतुपतिला अभिनयक्षेत्रात १७ वर्ष पूर्ण झाली आहे. त्याने सर्वोत्तम अभिनयासाठी अनेक अवॉर्डस देखील प्राप्त केले. विजयने ३ राष्ट्रीय पुरस्कार स्वतःच्या नावावर केले आहेत. शाहिद कपूरच्या आगामी ‘फर्जी ‘ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अश्या उत्तम कलाकाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *