|

तांत्रिकदृष्ट्या अजूनही संजय राठोड हेच वनमंत्री

Technically, Sanjay Rathore is the Forest Minister
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना अधिवेशना पूर्वी राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र हा राजीनामा राज्यपाल यांच्या पर्यंत पोहचला नसल्याचे समोर आले आहे. राजीनामा देऊन तीन दिवस झाले असले तरीही तो राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच आहे का असा प्रश्न पडला आहे. यामुळे तांत्रिकदृष्ट्या संजय राठोड हेच वनमंत्री आहेत.

पुण्यात ७ फेब्रुवारी पूजा चव्हाण या तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यासाबंधित ऑडीओ क्लीप बाहेर आल्यानंतर हे सर्व प्रकरण बाहेर आले होते. त्यात संजय राठोड यांचे नाव पुढे आल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता. जर संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याचे सांगितले होते.

अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या एक दिवस अगोदर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पुढे काय अशी विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यावर त्यांनी राजीनामा काय फ्रेम करून लावण्यासाठी घेण्यात आला नाही असे सांगितले होते. राजीनामा घेतल्या नंतर राज्यपाल भगतसिंघ कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात येणार असे त्यांना सूचित करायचे होते. मात्र तीन दिवसांनी सुद्धा अजूनही राजीनामा राज्यपाल यांच्याकडे पोहचला नाही. त्यामुळे ते अजूनही तांत्रिकदृष्ट्या वनमंत्री आहेत.

आत्महत्या प्रकरणात चौकशी पूर्ण होत नाही तो पर्यंत राजीनामा मंजूर करू नये अशी मागणी संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र याला विरोधी पक्षाने प्रचंड विरोध केला होता.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *