ताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आहे आणि…

पुणे: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर बोचरी टीका करत आता नवीन वसुली मंत्री कोण अशी विचारणा केली होती. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस कडून जोरदार प्रतिउत्तर देण्यात आहे. चित्रा ताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आहे आणि त्या नवीन वसुली मंत्री कोण हे विचारत आहेत असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.
मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले असल्याचा आरोप केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात चौकशी करून १५ दिवसात अहवाल सादर करावा असा आदेश दिला होता. यानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावर भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विट करत निशाणा साधला. “अखेर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. आता प्रश्न हा आहे की नवीन वसुली मंत्री कोण होणार? चेहरे बडल्याने महाविकास आघाडीचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही. अस वाघ यांनी ट्विट मध्ये म्हटले होते.
वाघ यांच्या टीकेला चाकणकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिले.
“चित्रा ताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण??
अहो ताई भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत ‘पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत’ हे म्हणायची वेळ येईल.
थोडा धीरज रखो, सब सच सामने आयेगा.!!