Friday, October 7, 2022
Homeब-बातम्यांचाताई, या विषाणूचा मी दोनवेळा सामना केलाय, मोठा भाऊ म्हणून मी सोबत...

ताई, या विषाणूचा मी दोनवेळा सामना केलाय, मोठा भाऊ म्हणून मी सोबत : धनंजय मुंडे

बीड : भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे यांनी स्वतः फेसबुकवर याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांना कोरोना झाल्याचे कळताच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन त्यांना आधार दिला आहे. यामध्ये मोठा भाऊ म्हणून ताई मी तुमच्या सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ट्विट मध्ये म्हणाले की, ”ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई.”

काही दिवसापूर्वी पंकजा मुंडे यांचा अंगरक्षक गोविंदा यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी त्या गेल्या होत्या. तसेच अहमदनगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे सुद्धा कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी त्या गेल्या होत्या. यानंतर कोरोना बाधीतांच्या संपर्कात आल्याचे लक्षात घेवून पंकजा मुंडे या काही दिवसापूर्वीच घरीच आयसोलेटे झाल्या होत्या. त्यांची चाचणी करण्यात आल्या नंतर गुरुवारी त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत त्यांनी फेसबुक वर पोस्ट लिहिली असून कोरोना झाल्याचे सांगितले आहे.

“मी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. मी ऑलरेडी आयसोलेटे आहे. कोरोना बाधितांच्या परिवाराच्या भेटी दिल्या तेव्हा लोकांच्या संपर्कात आले असेल..माझ्या समवेत दौऱ्यात असणाऱ्यांनी टेस्ट करून घ्यावी काळजी घ्यावी” असे आवाहन सुद्धा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे

काही दिवसांपूर्वीच बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली असून त्या सुद्धा घरीच आयसोलेटे आहेत. देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातही मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून येत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments