BMCच्या २ वर्षांच्या कामांची चौकशी होणार ; काँग्रेसकडून २५ वर्षांच्या कामाच्या चौकशीची मागणी

BMCच्या २ वर्षांच्या कामांची चौकशी होणार ; काँग्रेसकडून २५ वर्षांच्या कामाच्या चौकशीची मागणी

मुंबई, दि. ३१ ऑक्टोबर : राज्यातील भाजपाप्रणित सरकारने मुंबई महानगरपालिकेतील मागील दोन वर्षांतील कामांची कॅग मार्फत चौकशी करण्याचे दिलेले आदेश हे राजकीय द्वेषातून दिलेले आहेत. भारतीय जनता पक्ष स्वतःच भ्रष्टाचारात लिप्त झालेला असून आरोप मात्र विरोधी पक्ष व विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या संस्थांवर करत आहेत. भाजपाला खरेच भ्रष्टाचार निपटून काढायचा असेल तर फक्त २ वर्षांची…

अंधेरीत कोण अंधारात जाणार ? आधीच्या पोटनिवडणुकींचा इतिहास काय सांगतो?
|

अंधेरीत कोण अंधारात जाणार ? आधीच्या पोटनिवडणुकींचा इतिहास काय सांगतो?

सध्या राज्यात सगळ्यात जास्त चर्चेत असलेला राजकीय विषय म्हणजे अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. येत्या ३ नोव्हेंबरला ही निवडणूक पार पडणार आहे. पण या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापले आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं  शिवसेनेचे पारंपरिक असलेले धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात…

शिंदेंनी दाखवून दिले, ‘ठाकरेंशी’ वैर नाही, मात्र, उद्धव तुमची खैर नाही…

शिंदेंनी दाखवून दिले, ‘ठाकरेंशी’ वैर नाही, मात्र, उद्धव तुमची खैर नाही…

एकनाथ शिंदेंनी बंड करून गुवाहाटी गाठताच आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. पुढे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेतील एकेक शिलेदार आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. लोकसभेत राहुल शेवाळे यांना लोकसभेच्या गटनेतेपदी तर भावना गवळी यांना प्रतोद म्हणून नियुक्ती केली. तसेच इतर राज्यातील शिवसेना प्रमुखांना आपल्याकडे खेचून त्यांचा देखील पाठींबा मिळवण्यात शिंदेंना यश आलेले आहे. संघटनात्मक पातळीवर शिवसेनेला…

मातोश्रीला जेवढी सुरक्षा होती, तेवढीच सामनाच्या ऑफिसला, कारण… संजय राऊत

मातोश्रीला जेवढी सुरक्षा होती, तेवढीच सामनाच्या ऑफिसला, कारण… संजय राऊत

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. दरम्यान, आज त्यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले असून ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. राऊत यांच्यासह आता कुटुंबियांचीही देखील चौकशी सुरु असल्याचे समोर येत आहे. तर दुसरीकडे दादरमधील त्यांच्या फ्लॅटवरही ईडीचे अधिकारी हे दाखल झाले असून राऊत यांच्या ‘मैत्री’ या बंगल्याबाहेर…

बंडखोर आमदारांची द्विधा मनस्थिती; एकीकडे निष्ठा तर दुसरीकडे स्वाभिमान!
|

बंडखोर आमदारांची द्विधा मनस्थिती; एकीकडे निष्ठा तर दुसरीकडे स्वाभिमान!

राज्याचे माजी नगरविकासमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या पक्षाविरूद्ध एका रात्रीत बंड केलं. वेगवेगळ्या कारणावरून शिवसेनेचे नाराज आमदार एकामागून एक एकनाथ शिंदेंचे पाठीराखे झाले. सुरूवातीला 20 असलेल्या बंडखोर आमदारांची संख्या बघता बघता 40 झाली. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यामुळे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर दुसरीकडे…

संधिसाधू की गद्दार राजकारणी ; कोण आहेत दीपक केसरकर ??

संधिसाधू की गद्दार राजकारणी ; कोण आहेत दीपक केसरकर ??

एकनाथ शिंदे यांनी बंड करत सुरत व्हाया गुवाहाटी गाठली. त्यांनंतर एकापाठोपाठ एक शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत गेले. एकनाथ शिंदे आणि गटाला एकाचवेळी परत येण्याचे आवाहन आणि गद्दार म्हणत परत निवडून येण्याचे आव्हान शिवसेना देत होती. त्यामुळे बंडखोरांच्या वापसीऐवजी शिवसेनेला अधिकची गळती लागली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या जवळील एकेक आमदार…

११ जुलै…मुंबईकर हा काळा दिवस कधीच विसणार नाहीत!

११ जुलै…मुंबईकर हा काळा दिवस कधीच विसणार नाहीत!

आज ११ जुलै… समस्त मुंबईकरांसोबतच सगळ्या देशाला कटू आठवणी देणारा हा दिवस. १६ वर्षांपूर्वी मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले आणि मुंबईसोबतच सगळा भारत देश हादरून गेला. बॉम्बस्फोट इतके भीषण होते की यात दोनशेहून अधिक निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला तर सातशेपेक्षा अधिक लोक जखमी झाले. कोणी आपला भाऊ,आई,वडील, बहीण तर कोणी आपले जोडीदार…

दाऊदला दम भरणारा, ९० च्या दशकात अर्धा डझन पोलिसांच्या संरक्षणात फिरणारा पत्रकार…

दाऊदला दम भरणारा, ९० च्या दशकात अर्धा डझन पोलिसांच्या संरक्षणात फिरणारा पत्रकार…

फुटींना, बंडांना आणि सत्ता समीकरणाच्या धक्क्यांना तोंड देत शिवसेना टिकली, वाढत राहिली आणि तीनदा राज्याच्या सत्तेत आली. २०१२ साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. शिवसेनेची सगळी सूत्र उद्धव ठाकरेंच्या हाती आली. त्याआधी ६ वर्ष उद्धव ठाकरे राजकारणात पाय रोवून उभे होते. बाळासाहेबांनंतर उध्दव ठाकरेंचा राजकीय आलेख चढता राहिला. दोनदा राज्यात सत्ता मिळाली. पण…

भाजपच्या मदतीने दोन शिंदेंचं बंड : मध्यप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र थंड…

भाजपच्या मदतीने दोन शिंदेंचं बंड : मध्यप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र थंड…

एकनाथ शिंदेंनी बंडाचा झेंडा फडकवत भाजपच्या मदतीने महाविकास आघाडी सरकार पाडले. दोन वर्षांपूर्वी सेम असाच गेम मध्यप्रदेश काॅंग्रेसबरोबर झाला होता. ऐन कोरोना काळात काँग्रेसचे मध्य प्रदेशातील नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिंदे यांनी कमळ हाती घेताच त्यांच्या २० ते २२ समर्थक आमदारांनी राजीनामा दिला. त्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली…

प्रोफेशनल भरतनाट्यम डान्सर ते मिस इंडिया; असा होता सिनी शेट्टीचा प्रवास

प्रोफेशनल भरतनाट्यम डान्सर ते मिस इंडिया; असा होता सिनी शेट्टीचा प्रवास

3 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस इंडिया 2022 चा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये कर्नाटकच्या सिनी शेट्टीला मिस इंडिया 2022 ची विजेती घोषित करण्यात आली आहे. त्याचवेळी, राजस्थानच्या रुबल शेखावतला मिस इंडिया 2022 चा फर्स्ट रनर अप घोषित करण्यात आले, तर उत्तर प्रदेशच्या शिनाता चौहान हिला सेकंड रनर अपचा मुकुट…

अधिसत्तेला धक्का बसेल, म्हणून शिवसेना आरे मेट्रोला विरोध करत आहे ??
|

अधिसत्तेला धक्का बसेल, म्हणून शिवसेना आरे मेट्रोला विरोध करत आहे ??

मेट्रो ३ चे कारशेड आरे वसाहतीतच उभारण्याचा निर्धार नवनिर्वाचित शिंदे सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१९ मध्ये पेटलेला वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात मेट्रो ३ चे कारशेड आरे वसाहतीतच उभारण्याचा निर्णय झाला होता. पण वसाहतीतील नागरिकांनी व पर्यावरणप्रेमींनी या निर्णयाला विरोध करताच शिवसेनेने त्यांच्या सुरात सूर मिसळत सरकारमध्ये सामील असूनही या निर्णयाला…

एकनाथ शिंदेंची प्रतिमा उंचावली जावी, म्हणून तरडेंनी ‘धर्मवीर’ काढला ???
|

एकनाथ शिंदेंची प्रतिमा उंचावली जावी, म्हणून तरडेंनी ‘धर्मवीर’ काढला ???

एकनाथ शिंदेंचे बंड आणि त्यामागील पूर्ण प्लानिंग पाहता,या राजकीय नाट्याची एक-दोन दिवसात नव्हे तर गेले काही महिने, वर्षापासून स्क्रिप्ट लिहिली आहे का ? हा सवाल आहे. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील नाराजीची कुजबुज बाहेर आली होती. तसेच धर्मवीर या सिनेमानंतर दोघांमधील मतभेद वाढले असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. धर्मवीर सिनेमात…

खुद्द पंतप्रधानांनी जनता दलात येण्याची ऑफर दिली, पण भुजबळ कॉंग्रेसमध्येच गेले..

खुद्द पंतप्रधानांनी जनता दलात येण्याची ऑफर दिली, पण भुजबळ कॉंग्रेसमध्येच गेले..

१९९० साली व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारत २७% ओबीसी आरक्षण लागु केले. व्ही. पी. सिंग यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द गाजली ती मंडल आयोगामुळे. यामुळे देशाचे राजकारण फारच ढवळून निघाले होते. त्याला आपला महाराष्ट्र देखील अपवाद नव्हता. त्यात शिवसेना फूटीने मंडल आयोग अंमलबजावणीचे दूरगामी परिणाम महाराष्ट्र राज्याच्या राजकारणावर पडले. 10 ऑगस्ट 1990 ला तत्कालीन सरकारने…

शिंदेंचे बंड ; महाराष्ट्राला नव्या सरकारचे वेध ?, फडणवीस पुन्हा येणार ?
|

शिंदेंचे बंड ; महाराष्ट्राला नव्या सरकारचे वेध ?, फडणवीस पुन्हा येणार ?

आज पहाटे शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह आसाममधील गुहावटीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी आत्ताच ४६ आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. यागोदर त्यांनी ४० आमदार सोबत असून आणखी १० आमदार आमच्यासोबत येतील, असे शिंदे म्हणाले होते. तसेच सहा मंत्री देखील शिंदे यांच्यासोबत आहेत. आसाम पोलिसांच्या कडकोट बंदोबस्तात शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना सुरक्षितरीत्या…

बंडाच्या झळा अगोदरही सोसल्यात ; पण शिवसेनेला सावरणं आणि बहरणं माहिताय…

बंडाच्या झळा अगोदरही सोसल्यात ; पण शिवसेनेला सावरणं आणि बहरणं माहिताय…

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत उभी फुटली असून शिवसेनेच्या वर्चस्वाला नख लागले आहे. ठाकरे सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहेच पण संघटनात्मक पातळीवर शिवसेनेची मोठी पीछेहाट झाली आहे. ठिकठिकाणी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे निघू लागले आहेत. तर एकनाथ शिंदे समर्थका पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्यांचे सत्र सुरु केले आहे. शिंदे गट भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या बेतात आहे तर…

भाजपचं मिशन ४५ : सेना-राष्ट्रवादीच्या ‘या’ जागांवर डोळा

भाजपचं मिशन ४५ : सेना-राष्ट्रवादीच्या ‘या’ जागांवर डोळा

काल महाराष्ट्राचे पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मिशन ४५ घोषणा करून टाकली. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने महाविकासाआघाडीकडून एक जागा खेचून आणल्याने भाजपचा आत्मविश्वास सध्या प्रचंड वाढलेला दिसून येतोय. त्यामुळे २०२४च्या लोकसभा निवडणुकांची तयारी तयारी भाजपने १८ महिने आधीच सुरु केलेली दिसतेय. काय म्हणाले फडणवीस ? राज्यात आम्ही स्वबळाचा नारा दिलेला आहे त्यानुसार आता आम्हाला शिवसेना…

एका मोर्चाने राज आणि उद्धव यांच्यात कडव्या स्पर्धेची ठिणगी पडली…

एका मोर्चाने राज आणि उद्धव यांच्यात कडव्या स्पर्धेची ठिणगी पडली…

छगन भुजबळ यांच्या रूपाने शिवसेनेतून पहिला मोठा नेता बाहेत पडला. पुढे २००५ साली नारायण राणे कॉंग्रेसवासी झाले. हे दोन धक्के पचवताच शिवसेनेला तिसरा धक्का राज यांच्या रूपाने बसला. हा धक्का ठाकरेंकडून ठाकरेंना बसलेला असल्याने याचे दूरगामी परिणामी शिवसेनेच्या राजकारणावर नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणावर पडले. राज यांचे शिवसेना सोडण्याचे कारण सर्वश्रुत आहे. उध्दव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी…

शेतकऱ्यांचा बुलंद आवाज पुन्हा विधानपरिषदेवर जाणार ?

शेतकऱ्यांचा बुलंद आवाज पुन्हा विधानपरिषदेवर जाणार ?

सदाभाऊ खोत हे नाव आता बऱ्यापैकी लोकांना माहिती झालेय. पण एक काळ असा होता जेव्हा त्यांना शेतकरी संघटना सोडून बाहेर कोणी ओळखतदेखील नव्हते . शेतकरी संघटनेतून संघर्ष करत त्यांनी विधानपरिषद आणि राज्याच्या कृषीराज्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असलेल्या राजू शेट्टी यांचे ‘राईट हॅन्ड’ अशी सदाभाऊंची एके काळी ओळख होती. संघटनेत राहून त्यांनी…

लुंगी-बनियन घालून फिरणारा नेता पुढे संरक्षणमंत्री झाला…
| |

लुंगी-बनियन घालून फिरणारा नेता पुढे संरक्षणमंत्री झाला…

सडपातळ देहयष्टी, जाडेभरडा कुर्ता पायजमा, गुळगुळीत झालेली चप्पल आणि डोळ्यांवर चष्मा असा पेहराव असलेला साधा सरळ व्यक्ती देशाचा संरक्षणमंत्री असेल, असं कधी कोणाला वाटलं देखील नसेल. होय, आपण बोलतोय माजी संरक्षणमंत्री जाॅर्ज फर्नांडिस यांच्याबद्दल… आज जाॅर्ज फर्नांडिस यांची जयंती. 3 जून 1930 साली कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये जाॅर्ज फर्नांडिस यांचा जन्म झाला. पादरी बनण्यासाठी त्यांना ख्रिश्चन मिशनरीमध्ये…

ना खैरे, ना राजे! संजय पवारांची अचानक एन्ट्री, संभाजीराजेंचं गणित कुठं बिघडलं?
| |

ना खैरे, ना राजे! संजय पवारांची अचानक एन्ट्री, संभाजीराजेंचं गणित कुठं बिघडलं?

राज्यसभेच्या निवडणुका लागल्यानंतर आता राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. एकूण 56 जागांपैकी महाराष्ट्राच्या खात्यात 6 जागा आहेत. त्यातील 5 जागांवर बिनविरोध निवडणूक होणार हे निश्चित असलं तरी 6 व्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळालं होतं. शिवसेनेने 6व्या जागेसाठी दंड थोपटले आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण…

राज्यसभा निवडणूक : आणखी एक रेकॉर्ड संजय राऊतांच्या नावे झालाय!

राज्यसभा निवडणूक : आणखी एक रेकॉर्ड संजय राऊतांच्या नावे झालाय!

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यावर निकालाकडे डोळे लागले असतानच मविआच्या मतांवर भाजपने तर भाजपच्या मतांवर मविआने आक्षेप घेतला होता. त्यामुळे चुरशीच्या आणि अटीतटीच्या राज्यसभा निवडणुकीला वेगळेच वळण लागले. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, महिला व बालविकासमंत्री जितेंद्र आव्हाड व शिवसेनचे आमदार सुहास कांदे यांनी स्वपक्षाच्या दाखविली तसेच पक्षाच्या प्रतिनिधींच्या हातात मतपत्रिका दिल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. तर कॉंग्रेसने…

Ramesh Latke: सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष ते आमदार; असा होता रमेश लटके यांचा भन्नाट राजकीय प्रवास

Ramesh Latke: सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष ते आमदार; असा होता रमेश लटके यांचा भन्नाट राजकीय प्रवास

राजकारण हा विश्वासाचा खेळ मानला जातो. राजकारणातील काहीच नेते लोकांच्या मनात कायम राहतात. लोकांना मदत करणारे आणि सामाजिक कार्याचा वसा घेतलेले नेते लवकर एक एक पायरी चढत मोठमोठ्या पदापर्यंत पोहोचतात. मुंबईच्या अंधेरीपूर्व विधानसभा क्षेत्रात लोक विश्वासाने एक नाव घेतात, ते म्हणजे शिवसेना आमदार रमेश लटके. रमेश लटके यांचं काल सायंकाळी दुबईत हृदयविकाराचा झटका आल्याने निधन…

मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात वाढ, आजपासून लागू होणार नवीन किंमत
|

मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात वाढ, आजपासून लागू होणार नवीन किंमत

मुबई आणि आजूबाजूच्या शहरांमधील काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर तात्पुरत्या स्वरूपात 10 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत.दरवाढ मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करून दिली.महितीनुसार, मध्य रेल्वेचे हे पाऊल उन्हाळ्याच्या काळात रेल्वे स्थानकांवर गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर रोखण्यासाठी उचलण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात अनेक एक्स्प्रेस गाड्यांना…

जेम्स लेननी जे विकृत लेखन केले होते, त्याचा आधार त्यांनी पुरंदरेकडून घेतला होता – शरद पवार
|

जेम्स लेननी जे विकृत लेखन केले होते, त्याचा आधार त्यांनी पुरंदरेकडून घेतला होता – शरद पवार

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल ठाण्यामध्ये घेतलेल्या उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा जेष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षानंतर महाराष्ट्रात जातीवाद वाढला. शरद पवार हे नास्तिक आहेत. ते देव मानत नाहीत. त्या पद्धतीनेच ते त्यांचे म्हणणे मांडत असतात. त्या पद्धतीनेच ते धर्माकडे बघत असतात….

माझा प्रचाराचा पहिला नारळ कोणत्या मंदिरात फुटतो हे बारामतीमधल्या लोकांना जाऊन विचारा ; पवारांचा ठाकरेंना पलटवार
|

माझा प्रचाराचा पहिला नारळ कोणत्या मंदिरात फुटतो हे बारामतीमधल्या लोकांना जाऊन विचारा ; पवारांचा ठाकरेंना पलटवार

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल ठाण्यामध्ये घेतलेल्या उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा जेष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षानंतर महाराष्ट्रात जातीवाद वाढला. शरद पवार हे नास्तिक आहेत. ते देव मानत नाहीत. त्या पद्धतीनेच ते त्यांचे म्हणणे मांडत असतात. त्या पद्धतीनेच ते धर्माकडे बघत असतात,…

प्रवीण दरेकरांना मोठा दिलासा; उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
|

प्रवीण दरेकरांना मोठा दिलासा; उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई – राज्याचे विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबै बँकेच्या निवडणुकीमध्ये ‘बोगस’ मजूर प्रकरणी प्रवीण दरेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अनेक वर्ष तपास सुरू आहे त्यामुळे अटकेची आवश्यकता नसल्याचे, उच्च न्यायालायने सांगितले आहे. न्यायालयाचा हा निर्णय महाविकासआघाडी सरकारसाठी धक्कादायक असल्याचे बोलले…

मनसेने शिवसेना भवनासमोर लावली हनुमान चालिसा
|

मनसेने शिवसेना भवनासमोर लावली हनुमान चालिसा

मुंबई – महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रामनवमीच्या मुहूर्तावर मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावली आहे. मात्र, काही वेळातच पोलिसांनी शिवसेना भवन गाठून ते बंद करून घेतले. ज्या वाहनावर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण केले जात होते ते वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. त्याच बरोबर…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीएआयच्या ताब्यात, कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई
|

माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीएआयच्या ताब्यात, कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई

मुंबई – माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मोठा झटका बसला आहे. अनिल देशमुख यांचा ताबा आता सीबीआयकडे देण्यात आला आहे. आर्थर रोड तुरुंगातून आता सीबीआयने ताबा घेतला आहे. तसेच, देशमुखांची सीबीआय कोठडी मिळवण्यासाठी त्यांना कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. ‘ईडी’कडून पैशांच्या गैरव्यवहाराचा तपास सुरू असतानाच सीबीआयला मूळ १०० कोटी रुपयांच्या खंडणी…

मोठी बातमी! ईडीकडून संजय राऊत यांची मालमत्ता जप्त
|

मोठी बातमी! ईडीकडून संजय राऊत यांची मालमत्ता जप्त

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडालीय. अलिबागमधील 8 जागा आणि दादरमधील एक प्लॅट ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंगमधील पैशातून संपत्ती खरेदी केल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सगळी मालमत्ता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मित्र परिवाराची आहे….

जो पक्ष इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करू शकला नाही, त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचे; आदित्य ठाकरेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
|

जो पक्ष इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करू शकला नाही, त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचे; आदित्य ठाकरेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानामध्ये झालेल्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. शरद पवारांनी १९९९मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यामध्ये जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला. राज ठाकरेंच्या सभेनंतर महाविकास आघाडीकडून त्यांच्या वक्तव्यांवर टीका केली जात आहे. राज्याचे…