आशिक बनाया म्हणत आला आणि बॉलिवूडला ‘झलक’ दाखवली…

‘झलक दिखला जा, एक बार आजा’ हे शब्द माझ्या कानी पडले ते २०१० च्या आसपास. गावातल्या चौकात एक छोटसं इलेक्ट्रिकल दुकान होतं. तिथं टेप, टीवी दुरुस्त करून मिळायचे. शाळेतून येता जाता तिथन हे गाणं ऐकायला मिळायचं. नेहमी नेहमी ऐकल्यानंतर आपसूकच ‘हेलो मी बाबुराव बोलतोय, तुझी घागर नळाला लाव, देव धनगर वाड्यात घुसला’, वगैरे गाणी गुणगुणायची…